कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधून सुरू झाला होता. त्यानंतर चीनने कोरोनावर मात केल्याचे म्हटले असले तरी आता चीनच्या ग्वांगदोंग या प्रांतात पुन्हा एकदा कोरोना पसरू लागला आहे. त्यामुळे ग्वांगदोंग प्रांताची राजधानी असलेल्या ग्वांगझू शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. Corona erupts again in China, lockdown in Guangzhou
विशेष प्रतिनिधी
बिजींग : कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधून सुरू झाला होता. त्यानंतर चीनने कोरोनावर मात केल्याचे म्हटले असले तरी आता चीनच्या ग्वांगदोंग या प्रांतात पुन्हा एकदा कोरोना पसरू लागला आहे. त्यामुळे ग्वांगदोंग प्रांताची राजधानी असलेल्या ग्वांगझू शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
चीनमधूनच जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. वुहान या शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वुहान शहरातील लॅबोरेटरीमध्येच कोरोना विषाणू तयार केला गेल्याचा आरोपही होत आहे. मात्र, चीनमध्ये पहिल्या टप्यात कोरोना वेगाने पसरला होता. त्यामुळे चीनने अत्यंत कडक उपाययोजना केल्या होत्या. अनेक शहरे लॉकडाऊन केली होती. नागरिकांच्या घरांवर फळ्या ठोकून त्यांना बंदिस्त करण्यात आले होते. त्यामुळे चीनने कोरोनावर मात केली असे म्हटले जात होते. सहा महिन्यांपूर्वीच येथील सर्व व्यवहारही सुरू करण्यात आले होते.
मात्र, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चीनमध्ये ग्वांगदोंग भागात अनेक निर्बंध लादले आहेत. 31 मे रोजी चीनमध्ये 23 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्याच्या आदल्या दिवशी 27 नवे रुग्ण सापडले होते. यापैकी एक डझन रुग्ण हे दक्षिण ग्वांगदोंग भागाताली आहेत. हा प्रांत हॉंगकाँगला लागून आहे. यामुळे या भागात लॉकडाऊन सदृष्य स्थिती आहे. या प्रांताची राजधानी ग्वांगझूमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. इतर भागात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनेदेखील याचे वृत्त दिले आहे. ग्वांगझूमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. यामुळे तेथील बाजारपेठा, चाईल्ड केअर सेंटर आणि मनोरंजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, स्कूलदेखील बंद करण्यात आल्या आहेत. ग्वांगदोंगमध्ये विमान, ट्रेन आणि बसद्वारे ये-जा करण्यासाठी मागील 72 तासांत केलेली कोरोना चाचणी रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App