भारतामध्ये कोरानाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळत असले तरी जगातील अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा एकदा कहर सुरू झाला आहे. दोन आठवड्यांतच चीनमधील १४ प्रांतात कोरोना पोहोचला आहे. ब्रिटनपासून, रशिया आणि अन्य देशांतही हजारो नवे रुग्ण सापडत आहेत. ब्रिटनमध्ये तर प्रत्येक पन्नासावी व्यक्ती कोरोनाने बाधित झाली आहे.Corona catastrophe in many countries of the world, Corona reached 14 provinces in China in two weeks
विशेष प्रतिनिधी
शांघाय : भारतामध्ये कोरानाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळत असले तरी जगातील अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा एकदा कहर सुरू झाला आहे. दोन आठवड्यांतच चीनमधील १४ प्रांतात कोरोना पोहोचला आहे. ब्रिटनपासून, रशिया आणि अन्य देशांतही हजारो नवे रुग्ण सापडत आहेत. ब्रिटनमध्ये तर प्रत्येक पन्नासावी व्यक्ती कोरोनाने बाधित झाली आहे.
चीनमध्ये कोरोनाचा कहर भयानक आहे. गेल्या चौदा दिवसांत देशातील १४ प्रांतात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने समुद्र सीमांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी संपूर्ण जगातील देशांना आवाहन केले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींना लवकरात लवकर मान्यता द्यावी.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १७ ते २९ ऑक्टोबरच्या दरम्यान चीनमध्ये ३७७ नवे रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाही. त्यामुळे कोरोना रोखणे मुश्किल झाले आहे. संक्रमणाची गती वाढत आहे.
Coronavirus update : देशात २४ तासांत कोरोनामुळे २१४ जणांचा मृत्यू, १८,१६६ नवे रुग्ण; रुग्णसंख्या घटल्याने दिलासा
ब्रिटनमध्ये शनिवारी ४१,२७८ नवीन रुग्ण सापडले आहेत. शनिवारी १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारीनंतर झालेला हा सर्वाधिक उद्रेक आहे. जानेवारीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही इतके रुग्ण नव्हते.
रशियामध्येही शनिवारी ४० हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. एकाच दिवशी ११६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुल्गारिया देशात ५२५६ नवीन रुग्ण तर १५४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ९२ टक्यांहून लोक असे आहेत की त्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App