वृत्तसंस्था
मॉस्को: जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियात, रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एका दिवसांत ९७३ जणांचा बळी गेल्याने रशियन सरकार खडबडून जागे झाले आहे.Concerns over rising number of corona patients in Russia, More than 900 people were killed in one day
रशियाने स्पुटनिक-व्ही (Sputnik-V) ही जगातील पहिली लस तयार केली होती. पण, लसीकरण वेगाने झालेले नाही. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर आता रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. १२) कोरोनामुळे ९७३ लोकांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत ७८ लाख कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. २.१८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाची सांख्यिकी संस्था रोझस्टॅटनुसार ४.१७ लाख लोक बळी गेले आहेत.
मंद लसीकरणाचा मोठा फटका
रशियाची लोकसंख्या १४.६० कोटी आहे. यापैकी केवळ ३३ टक्के म्हणजेच ४.७८ कोटी लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. तर ४.२४ कोटी लोकांना म्हणजेच २९ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App