२०२५ नंतर कोल्ड प्ले अल्बम बनवणार नाहीत? लीड सिंगर ख्रिसने केला खुलासा

विशेष प्रतिनिधी

लंडन : 1996 साली लंडनमध्ये कोल्ड प्ले हा ब्रिटिश रॉक बॅंड निर्माण झाला होता. यांनी बनवलेली एक आणि एक गाणी जगप्रसिद्ध आहेत. आजवर कोल्ड प्ले तर्फे एकूण 8 अल्बम प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यांचा नवा अल्बम ‘म्युझिक ऑफ द स्फीअर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ख्रिसमसच्या नाईटच्या निमित्ताने बीडीसीए रेडिओवर दिलेल्या मुलाखतीमधील सिंगर ख्रिस मार्टीन याने एक खळबळजनक खुलासा केला आहे.

coldplay Won’t make a album after 2025 as a band? Revealed by Lead Singer Chris

त्यांच्या म्हणण्यानुसार, या नव्या अल्बमनंतर अजून 3 अल्बम एकत्र बनवतील. 2025 नंतर ते अल्बम बनवण्याचे थांबवतील. त्यानंतर फक्त टूर्स आणि कोलॅबरेटिव्ह काम केले जाईल. कॉल्ड प्लेच्या चाहत्यांना आत्तापासूनच या गोष्टीचा धक्का बसू शकतो. कारण वर्षानुवर्षे तीच तीच गाणी ऐकून देखील कधीही न बोर होणारी गाणी म्हणजे कोल्ड प्लेची गाणी.


गे सांता आणि ख्रिसमस : नॉर्वे मधील ही पोस्टल सर्व्हिसची ऍड पहिली का?


क्रिस मार्टिन, जॉनी बकलँड, गाय बेरीमन, वील चॅम्पियन, फिल हार्वे हे बँडमधील बाकी सदस्य आहेत.

बीबीसी रेडिओवर मुलाखत घेणारी जो हिने या गोष्टी बद्दल सांगताना म्हटले आहे की, मला वाटत नाही की ख्रिस या गोष्टींबाबत सीरियसली बोलत होता. कारण तो बऱ्याच वेळा मजेत बोलत असतो. पण जर ही गोष्ट खरी असेल तर मात्र कोल्डप्लेच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे.

coldplay Won’t make a album after 2025 as a band? Revealed by Lead Singer Chris

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात