वृत्तसंस्था
रोम : g20 परिषदेच्या निमित्ताने इटलीची राजधानी रोममध्ये जमलेल्या 20 देशांच्या राष्ट्रप्रमुख यांनी सुप्रसिद्ध ट्रेव्ही फाऊंटनला भेट दिली. यावेळी या सर्व नेत्यांनी तिथल्या प्रथेनुसार ट्रेव्ही फाऊंटनमधील फौंटन मधल्या विशिंग वेलमध्ये नाणेफेक केली.Coin toss of G-20 heads of state at Rome’s historic Trevi Fountain’s Wishing Vail
या विशिंग वेलमध्ये नाणेफेक करणारी व्यक्ती पुन्हा रोमला येते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या सर्व राष्ट्रप्रमुखांनी आपली पुन्हा रोमला येण्याची इच्छाच यानिमित्ताने व्यक्त केली आहे.ट्रेव्ही फाऊंटन हे रोम मधले एका ऐतिहासिक स्थळ मानले जाते. अनेक सिनेमांच्या चित्रीकरणातून ते जगभरात प्रसिद्ध झाले आहे.
या फाउंटनला 20 देशांच्या राष्ट्रप्रमुख यांनी g20 परिषदेच्या वेळातून वेळ काढत एकत्र भेट दिली. तेथे फोटो सेशन केले. आणि सर्वांनी विशिंग वेलमध्ये आपापल्या देशांची नाणेफेक केली. प्रत्येक नेत्याने या पृथ्वीच्या कल्याणाची इच्छा यावेळी व्यक्त केली.
ट्रेव्ही फाऊंटनच्या भेटीनंतर सर्व नेत्यांची हवामान बदला संदर्भातली बैठक रोम इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर मध्ये सुरू झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिन्यूएबल एनर्जी अर्थात पुनर्वापर ऊर्जा या विषयावर ठराव मांडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App