वृत्तसंस्था
इस्लामाबाद : भारताला घेरण्यासाठी चीन-पाकिस्तानशी मैत्री करताना अनेक उदाहरणे दिली जात होती. ‘पाक-चीन मैत्री हिमालयासारखी उत्तुंग, महासागराहून खोल, मधाहून गोड, पोलादाहून बळकट’ असे बोलले जात होते. परंतु या मैत्रीत आता विश्वास कमी होत चालल्याचे दिसते. चीनने पाकिस्तानातील आपली महत्त्वाकांक्षी योजना बेल्ट रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) अंतर्गत तयार होणाऱ्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (सीपॅक) प्रकल्पात गुंतवणूक केल्या जाणाऱ्या 60 अब्ज डॉलरचा निधी रोखला आहे.Chinese projects in Pakistan on hold; 5 lakh crore dream project Seapac in crisis
चीनने पाकिस्तानमध्ये सीपॅक अंतर्गत वीज, जल व्यवस्थापन, हवामान बदल प्रकल्पावर पैशांची गुंतवणूक करण्यासही अलीकडेच नकार दिला आहे. त्याशिवाय पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान, खैबरपख्तुनख्वा, पाकव्याप्त काश्मीरसह किनारपट्टीच्या भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणुकीसही चीनने स्पष्ट नकार कळवला आहे. सीपॅक प्रकल्प पुढे नेण्याची मुळीच इच्छा नसल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था, आर्थिक-राजकीयदृष्ट्या स्थैर्य दिसून आले तरच नवीन प्रकल्पात गुंतवणूक केली जाईल, असे चीनने सांगून टाकले आहे. पाक कर्जाची परतफेड करेल यावर चीनला विश्वास नाही. पाकिस्तानवर दिवाळखोरी आली आहे. आर्थिक तंगीमुळे पाकिस्तान सीपॅक प्रकल्पात सहकार्य करत नाही. त्याशिवाय चीनचे मोठे कर्ज पाकिस्तानवर आहे. त्यामुळेच पाकिस्तान चिनी गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना परत करेल की नाही याबाबत चीनला विश्वास राहिलेला नाही. पाकिस्तानने चीनव्यतिरिक्त सौदी अरेबिया, यूएईकडून कर्ज घेतले आहे. सीपॅकद्वारे सर्व प्रकारच्या समस्यांची सोडवणूक होऊ शकते. बलुच लिबरेशन आर्मी हा धोका असल्याचे चीनला वाटते. त्याशिवाय अल-कायदा, इसिसनेदेखील चीनच्या कॉरिडॉर प्रकल्पाला लक्ष्य केले आहे. त्याशिवाय पाकमधील केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संयुक्त प्रकल्पाविषयी सहमती नसल्याचेही चीनला वाटते. ताळमेळ नसल्याने चिनी अभियंते, कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
अमेरिका अफगाणिस्तानातून परतताच पाकचे महत्त्व घटले
काही वर्षांपूर्वी चीन पाकिस्तानला खूप महत्त्व देत होते. कारण तेव्हा अफगाणमध्ये अमेरिकन सैन्य तैनात होते. त्यामुळेच चीनला पाकिस्तानात गुंतवणूक करण्याची गरज भासली. अमेरिकन सैन्य अफगाणमधून मायदेशी जाताच चीनच्या दृष्टीने पाकचे महत्त्व कमी झाले. चीन-अमेरिकेत तणाव होता. अमेरिकेलाही पाककडून अफगाणविषयी मदत आणि चीनविरोधात सहकार्य हवे होते. ग्वाडरसह इतर ठिकाणी चीनच्या प्रकल्पाला विरोध होत आहे.
चीनच्या निर्णयावर टीका
चीनने आपला निर्णय पाकिस्तानातील सरकारचा रोख पाहून घेतल्याचे तज्ज्ञांना वाटते. अमेरिका, चीनसह इतर देशांकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतरही पाकिस्तानचे अर्थमंत्री देशाच्या अर्थव्यवस्थेला गती का देऊ शकत नाही, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. चीनच्या नव्या निर्णयामुळे पाकिस्तानातून टीका सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App