विशेष प्रतिनिधी
नाशिक : Diwali Laxmi Pujan Muhurat : दिवाळी हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आले आहे. Diwali Laxmi Pujan Muhurat
आश्विन वद्य आमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. या रात्रीची केवळ द्यूत खेळावे, असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल आहे, हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना असावी.
श्रीलक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.
लक्ष्मीपूजन मुहूर्त
भारतीय पंचागात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाचे दोन शुभ मुहूर्त आहे.
१. दुपारी १:४२ ते २:४८ पर्यंत २. संध्याकाळी ५.५५ ते ८:२८ पर्यंत
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर २ तासांच्या काळात खालील मंत्र म्हणून लक्ष्मी इंद्र पूजन करावे.
लक्ष्मीपूजा मंत्र आणि इंद्रपूजा मंत्र
लक्ष्मीपूजा मंत्र : ‘नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। धनदायै नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदः ।।’
इंद्रपूजा मंत्र : ‘ऐरावत समारूढो वज्रहस्तोमहाबलः । शतयज्ञाभिधो देवस्तस्मादिन्द्राय ते नमः ।।’
(मराठी विश्वकोषावर आधारित)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more