Long March 5 B rocket will crash on the earth : महत्त्वाकांक्षी चीन केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अवकाशातही महाशक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनच्या चाचण्या मात्र आता हळूहळू पृथ्वीसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. एक विशालकाय चिनी रॉकेट अवकाशात अनियंत्रित झाले आहे. ते शनिवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनला स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करायचे आहे. या प्रस्तावित अंतराळ स्थानकाचा मुख्य भाग चीनने नुकताच अंतराळात प्रक्षेपित केला होता. परंतु ते घेऊन जाणारे रॉकेट अनियंत्रित झाल्याने अवकाशात भरकटले आणि आता शनिवारी ते पृथ्वीवर कोसळणार आहे. साधारणपणे पृथ्वीच्या वायुमंडळात घर्षणामुळे रॉकेटचे तुकडे नष्ट होतात, परंतु चिनी रॉकेटबाबत मात्र असे नाहीये, म्हणूनच चिंता वाढलीये. Chinese Long March 5 B rocket will crash on the earth In next two days, possibility of a major catastrophe
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महत्त्वाकांक्षी चीन केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अवकाशातही महाशक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनच्या चाचण्या मात्र आता हळूहळू पृथ्वीसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. एक विशालकाय चिनी रॉकेट अवकाशात अनियंत्रित झाले आहे. ते शनिवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनला स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करायचे आहे. या प्रस्तावित अंतराळ स्थानकाचा मुख्य भाग चीनने नुकताच अंतराळात प्रक्षेपित केला होता. परंतु ते घेऊन जाणारे रॉकेट अनियंत्रित झाल्याने अवकाशात भरकटले आणि आता शनिवारी ते पृथ्वीवर कोसळणार आहे. साधारणपणे पृथ्वीच्या वायुमंडळात घर्षणामुळे रॉकेटचे तुकडे नष्ट होतात, परंतु चिनी रॉकेटबाबत मात्र असे नाहीये, म्हणूनच चिंता वाढलीये.
चीनचे हे रॉकेट तब्बल 100 लांब आहे. याचे वजन 21 टन आहे. या दोन दिवसांत हे रॉकेट पृथ्वीला दोन प्रदक्षिणा घालणार आहे. हे रॉकेट एका तासात 18 हजार मैलांचा प्रवास करत आहे. जर एखाद्या दाटीवाटीच्या लोकवस्तीत हे पडले तर मोठा विध्वंस घडणार आहे.
चिनी अंतराळ संस्थेने आतापर्यंत हे स्पष्ट केलेले नाही की, विशालकाय 5बी रॉकेटच्या कोअर स्टेजला नियंत्रित केले जात आहे की हे अनियंत्रित होईल? गतवर्षी मे महिन्यातही चीनचे एक रॉकेट अनियंत्रित होऊन अटलांटिक महासागरात कोसळले होते.
चिनी रॉकेटचे भाग आणि याच्या प्रक्षेपवक्राबाबत मूलभूत माहितीही अज्ञात आहे. कारण चिनी सरकारने आतापर्यंत या घटनेवर सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही. तथापि, चिनी कम्युनिस्ट पक्षाने प्रकाशित केलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे की, या रॉकेटची अॅल्युमिनियम-मिश्र धातूंचे बाहेरचे पातळ आवरण वातावरणात सहज जळून जाईल आणि यामुळे जोखीम कमी असेल.
अंतराळात असलेल्या कचऱ्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला सहसा धोका नसतो, परंतु यामुळे हवामान, पर्यावरणाची माहिती गोळा करणाऱ्या सक्रिय उपग्रहांना निश्चितच धोका आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, चीनच्या लाँग मार्च 5 बी रॉकेटचा काही भाग 8 ते 10 मेदरम्यान पृथ्वीवर कोसळणार आहे. यूएस स्पेस कमांड सातत्याने या रॉकेटचा मागोवा घेत आहे. परंतु पृथ्वीपासून या रॉकेटचे नेमके स्थान सांगणे सध्या तरी अवघड आहे.
Chinese Long March 5 B rocket will crash on the earth In next two days, possibility of a major catastrophe
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App