विशेष प्रतिनिधी
बिजींग : जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी आणि भक्कम मानली जाणारी चीनची अर्थव्यवस्था आतून पोकळ झाल्याचे दिसून येत आहे. या भक्कम अर्थव्यवस्थेचा फुगा फुटू लागला असून आणखी एक बडी रिअल इस्टेट कंपनी बुडण्याच्या मार्गावर आहे.China’s strong economic bubble bursts as anothe real estate company sinks
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनमधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँड कंपनी कर्जाच्या खाईत बुडाली आहे. यानंतर आता आणखी एक बडी कंपनी बुडू लागल्याने चीनचा बुडबुडा फुटणार आहे. गेल्या सोमवारी काही अमेरिकी डॉलर बाँडचे हप्ते भरण्याची शेवटची तारीख चुकविली आहे. यानंतर चीनची आणखी एक रिअल इस्टेट कंपनी कैसाने देखील डिफॉल्ट केले आहे.
यानंतर हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजने कैसा ग्रुप होल्डिंग्जच्या शेअरच्या खरेदी-विक्रीवर बंधने आणली आहेत. पैसे चुकते करता न आल्याने ही कंपनी दिवाळखोरीत जाण्याच्या उंबरठ्यावर आहे.चीनच्या या मोठ्या प्रॉपर्टी डेव्हलपरने काही महिन्यांपूर्वी 300 अब्ज डॉलर्स जमा केले होते. यानंतर एकही डॉलर देऊ शकला नाही.
रेटिंग एजन्सी फिंचने चीनच्या एव्हरग्रँडच्या ओव्हरसीज बाँडला डिफॉल्ट घोषित केले आहे. कंपनी व्याज देखील देऊ शकली नाहीय. सोमवारी कंपनीला 8.82 कोटी डॉलरचे पेमेंट करायचे होते. परंतू यात अपयश आले आहे. एव्हरग्रँडने ग्वांगडोंगच्या सरकारकडून मदत मागितली होती.
यावर एका समितीचे गठण करण्यावर बोलणी झाली आहे. आता या संकटाची झळ अन्य कंपन्यांना बसण्याची किंवा अन्य कंपन्यांना देखील हे संकट डुबविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 6.5 टक्के व्याज दराच्या या बाँडचे पेमेंट करू न शकल्याने कैसा आता तांत्रिक रुपात डिफॉल्ट श्रेणीत गेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App