विशेष प्रतिनिधी
चीन: चीनने शेनझोउ १३ अंतर्गत पाठवण्यात येणाऱ्या अंतराळवीरांची नावे अजून अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. पण वॅंग यिपिंग स्पेस स्टेशनला जाणारी प्रथम अंतराळवीर महिला असेल.
China to send 1st Female Astronaut to New Space station under Shenzhou 13 Mission
आगामी शेनझोऊ १३ या मिशन वर महिला अंतराळवीर पाठवण्याचे ठरवले असल्याचे वृत्त माध्यमातून समजत आहे.
स्पेस.कॉमनी दिलेल्या माहितीनुसार गोबी वाळवंटातील जिउक्वान येथून शेनझोऊ १३ पाठवले जाणार आहे. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी वॅंग यिपिंग ही पहिली महिला ठरणार आहे. १२ अंतराळवीर पाठवले आहेत पण त्यापैकी दोनच महिला आहेत. लिउ यांग २०१२ मध्ये शेनझोऊ ९ या मोहिमेत सहभागी होती.
चीनची अंतराळातही तळ उभारणी, ‘तियानझोऊ ३’ या कार्गो स्पेसशिपचे उड्डाण
वॅंग ही स्पेस स्टेशन मिशनसाठी प्रशिक्षण घेत होती.
चिनने या आधी ३ अंतराळवीरांचे शेनझोउ मिशन पूर्ण केले आहे. शेनझोऊ १३ हे स्पेस स्टेशन बांधणीतील या वर्षीचे शेवटचे मिशन असेल. पूर्ण झाल्यानंतर टिअॅनगॉंग (स्वर्गीय राजवाडा) हे पहिले टि शेप मल्टिमॉड्यूल स्पेस स्टेशन असेल. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार तीआगोंग याचे वस्तुमान १०० टन आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सुमारे एक चतुर्थांश आकाराचे हे वस्तुमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App