वृत्तसंस्था
बीजिंग : संयुक्त राष्ट्राने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. याच्या एका दिवसानंतर चीनने भारतातील लोकसंख्येवर वादग्रस्त विधान केले आहे.China said on India’s population- not quantity, quality is important, China’s foreign ministry said- our 90 crore people are working, they have talent too.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, केवळ देशाची लोकसंख्याच महत्त्वाची नाही, तर त्यांची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. भारताच्या लोकसंख्येशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात वांग वेनबिन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
चीनमध्ये 90 कोटी लोक वर्किंग एजचे
वांग म्हणाले, ‘संख्येसोबतच कोणत्याही देशात टॅलेंट असणेही महत्त्वाचे असते. चीनमधील 90 कोटी लोक वर्किंग एजचे आहेत, म्हणजेच ते काम करण्याच्या वयात आहेत. तर, आपल्या देशात सरासरी एक व्यक्ती किमान 10 वर्षांपेक्षा जास्त काळ शाळेत शिकते. वास्तविक, भारतातील हा आकडा चीनपेक्षा कमी आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, येथील एक व्यक्ती सरासरी 5 वर्षेच शाळेत जाते.
चीनमध्ये वृद्धांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्यासाठी तीन अपत्य धोरणाचा विचार केला जात असल्याचेही वांग वेनबिन यांनी सांगितले.
भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 30 लाखांहून जास्त
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) च्या अहवालानुसार आता भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख आहे. आणि चीनची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख आहे. म्हणजेच आपली लोकसंख्या चीनच्या तुलनेत 30 लाखांनी जास्त आहे.
2022 मध्ये चीनची लोकसंख्या 60 वर्षांत प्रथमच कमी झाली. गेल्या वर्षी चीनच्या राष्ट्रीय जन्मदरात विक्रमी घट नोंदवण्यात आली होती. सन 2022 मध्ये चीनमध्ये 95 लाख मुलांचा जन्म झाला होता, तर 2021 मध्ये तेथे 1 कोटी 62 लाख मुलांचा जन्म झाला होता.
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने अहवाल दिला होता की 2021 मध्ये चीनमध्ये जन्मदर 7.52% होता, जो 2022 मध्ये कमी होऊन 6.67% झाला. याचा अर्थ असा की चीनमध्ये 2021 मध्ये दर हजार लोकांमागे 7.52 मुले जन्माला आली होती, ती 2022 मध्ये 6.67 पर्यंत कमी झाली. 1949 नंतरचा हा नीचांक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App