Economic Bans On Afghanistan : चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी तालिबानला पाठिंबा देत म्हटले की, जगाने अफगाणिस्तानवरील एकतर्फी आर्थिक निर्बंध लवकरात लवकर उठवावेत. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचा परकीय चलनसाठा ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे ज्यावर त्या देशातील नागरिकांचा हक्क आहे. त्यांच्या स्वतःच्या लोकांनी ती वापरली पाहिजे. अफगाणिस्तानवर राजकीय दबाव आणण्यासाठी कोणतेही सौदेबाजी करू नये. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातील नागरिकांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जाऊ नयेत. China Foreign Minister Wang Yi Says Economic Bans On Afghanistan Must End
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी तालिबानला पाठिंबा देत म्हटले की, जगाने अफगाणिस्तानवरील एकतर्फी आर्थिक निर्बंध लवकरात लवकर उठवावेत. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचा परकीय चलनसाठा ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे ज्यावर त्या देशातील नागरिकांचा हक्क आहे. त्यांच्या स्वतःच्या लोकांनी ती वापरली पाहिजे. अफगाणिस्तानवर राजकीय दबाव आणण्यासाठी कोणतेही सौदेबाजी करू नये. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातील नागरिकांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जाऊ नयेत.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, चीन हे सर्व आपल्या फायद्यासाठी करत आहे. कारण त्यांना अफगाणिस्तानच्या रूपाने आपली ताकद वाढवण्यासाठी आणखी एक चांगली जागा सापडली आहे. त्यांच्या मते, चीनची रणनीती तीन मुद्द्यांवर काम करते. पहिला म्हणजे त्याचा सामरिक आणि व्यावसायिक फायदा, दुसरा भारताचा तोटा आणि तिसरा म्हणजे अमेरिका, या तिन्ही मुद्द्यांसाठी अफगाणिस्तान उपयुक्त आहे.
रशियाबरोबरच पाकिस्तान आणि चीन तालिबानला मान्यता मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. याव्यतिरिक्त ते अफगाणिस्तानला लागून असलेल्या देशांचा एक नवीन गट तयार करण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहेत. या गटात चीन, पाकिस्तान, इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.
भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा कोणत्याही प्रकारे दहशतवादासाठी वापर करू न देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करावी. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जी -20 देशांना सांगितले की, जगाला अशा व्यापक आणि सर्वसमावेशक प्रक्रियेची गरज आहे. अफगाणिस्तानात समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणे अपेक्षित आहे. जयशंकर म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अफगाणिस्तानवरील ठराव 2593 जागतिक भावना प्रतिबिंबित करतो आणि आमच्या या दृष्टिकोनाचे मार्गदर्शन सुरू राहिले पाहिजे.
China Foreign Minister Wang Yi Says Economic Bans On Afghanistan Must End
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App