चीनने पाकिस्तानच्या खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले; जिवाच्या भीतीमुळे तब्बल 1500 चिनी कर्मचाऱ्यांना पाकमधून काढणार

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानाच्या शांगला जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 अभियंते ठार झाल्यानंतर चिनी कर्मचारी दहशतीत आहेत. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने मोठे पाऊल उचलले आहे. खैबर पख्तुनख्वामधील तीन प्रकल्पांवर काम करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांनी काम थांबवले आहे. यासोबतच चीन आपल्या सुमारे 1500 नागरिकांना तेथून बाहेर काढत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत कळवले की, ते आणखी जोखीम घेऊ शकत नाहीत. तिन्ही प्रकल्प 9860 मेगावॅटचे आहेत.China blocked three power plants in Pakistan’s Khyber; As many as 1500 Chinese employees will be removed from Pakistan due to fear of their lives



स्थानिक कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले

4320 मेगावॅट क्षमतेचा दासू धरण प्रकल्प कोहिस्तान जिल्ह्यात आहे. हे पेशावरपासून 350 किमी अंतरावर आहे. मारले गेलेले अभियंते याच ठिकाणचे होते. 741 चिनी आणि 6,000 स्थानिक कर्मचारी आहेत. चिनी नागरिकांना बाहेर काढले जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर चिनी कामगार घाबरले असल्याचे प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

स्वात नदीवर असलेले धरण यावर्षी पूर्ण होणार आहे. 740 मेगावॅट जलविद्युत निर्माण होईल. 250 चिनी कर्मचारी काम करत आहेत. या प्रकल्पांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, दासू आणि दियामेर-भाषा धरणांमधून चिनी नागरिकांना लष्करी हेलिकॉप्टरने किंवा रस्त्यावर संचारबंदी लागू करून बाहेर काढले जाईल. चिनी नागरिक शनिवारपर्यंत पाकिस्तानमधून चीनला जाऊ शकतात.

China blocked three power plants in Pakistan’s Khyber; As many as 1500 Chinese employees will be removed from Pakistan due to fear of their lives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात