विशेष प्रतिनिधी
बुडापेस्ट – चीनने विकसीत केलेली सिनोफार्म ही कोरोना प्रतिबंधक लस ही फारशी प्रभावी ठरत नसल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे. यामुळे ज्या देशांमध्ये या लशीचा वापर करून लसीकरण मोहिम राबविली गेली आहे, त्याठिकाणच्या जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्नपचिन्ह उपस्थित केले जात आहे.Chians vaccine is week
हंगेरीमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला. सिनोफार्म लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी विविध वयोगटातील ४५० जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यानुसार, वयाच्या पन्नाशीच्या आतीत नागरिकांना लशीमुळे ९० टक्के संरक्षण मिळते.
मात्र, त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देताना प्रभाव कमी होत असल्याचेही आढळून आले आहे. ८० वर्षांपुढील नागरिकांमध्ये तर लस केवळ ५० टक्केच प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
हा अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला असून अद्याप इतर शास्त्रज्ञांनी त्याला मान्यता दिलेली नाही. चीनच्या आरोग्य यंत्रणेने या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App