वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या अवघ्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून 45 दिवसांत ट्रस यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनमधील सत्तानाट्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ट्रस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे. Britain’s government collapsed again; Liz Truss became Prime Minister for a month and a half
नव्या पंतप्रधान पदासाठी शर्यत
ब्रिटनमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी वाढल्यामुळे ट्रस यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्याआधीच ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनमधील खासदार ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. लिझ ट्रस यांच्याच वेळी ते स्पर्धेत होते. पण अवघ्या काही मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
ट्रस यांची घोषणा
ज्या आश्वासनांसाठी मी लढा देत होते ती आश्वासनं मी पूर्ण करू शकेन असे मला सध्याची परिस्थिती पाहता वाटत नाही. त्यामुळेच मी माझ्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आहे. ज्यावेळी मी या पदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा देशात आर्थिक स्थैर्य नव्हते. आम्ही देशातले कर कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण ते सध्यातरी पूर्ण होईल असे वाटत नसल्यामुळे मी माझे पद सोडत आहे,अशी घोषणा लिझ ट्रस यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App