तालिबानबद्दल बोरिस जॉन्सन यांचे सूर बदलले, म्हणाले – गरज पडल्यास त्यांच्यासोबत काम करू


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तालिबानबाबत मोठे विधान केले आहे. गरज पडल्यास तालिबानसोबत काम करण्यास ब्रिटन तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तान समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रत्येक स्तरावर आमचे प्रयत्न सुरू ठेवू. अफगाणिस्तानला मजबूत बनवण्याची आमची वचनबद्धता आहे, असेही ते म्हणाले.Britain PM Boris Johnson Ready To Work With Taliban Latest News Update

ब्रिटन अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकांना परत आणण्यासाठी मोहीम राबवत आहे. यासंदर्भात जॉन्सन म्हणाले की, आता विमानतळावरील परिस्थिती सुधारत आहे. काल आम्ही एक हजार लोकांना बाहेर काढण्यात यशस्वी झालो.



आम्ही ARAP अंतर्गत अनेक लोकांना वाचवत आहोत. असे अनेक अधिकारी आहेत ज्यांनी ब्रिटनसाठी खूप काही केले आहे, त्यामुळे त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. आगामी काळात आम्ही अधिक वेगाने काम करणार आहोत.

जॉन्सन म्हणाले की, अफगाणिस्तानातून लोकांना आणताना आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आमची टीम सतत काम करत आहे आणि या कठीण परिस्थितीत आपली क्षमता सिद्ध करत आहे. ब्रिटन व्यतिरिक्त भारत, अमेरिकादेखील मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य चालवत आहेत.

काबूल विमानतळावर अमेरिकेची लढाऊ विमाने सतत दिसून येत आहेत. तेथील लष्करानुसार, 7000 हून अधिक लोकांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले आहे. दुसरीकडे, भारतही आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

Britain PM Boris Johnson Ready To Work With Taliban Latest News Update

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात