विशेष प्रतिनिधी
कॅलिफोर्निया – अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन (वय ७५) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल,Bill Clinton hospitalised
अशी माहिती अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली. ‘क्लिंटन यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी कळविले असल्याचे बायडेन म्हणाले.क्लिंटन यांच्यावर कोरोना व्यतिरिक्त संसर्गावर उपचार सुरू आहेत,
अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली. क्लिंटन यांच्या रक्तात संसर्ग झाला असून त्यांच्या शरीरात आयव्ही अँटीबायोटिक्ससह अन्य काही पदार्थ आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत,असे बिल क्लिंटन यांचे डॉक्टर आणि इरविन मेडिकल सेंटरच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. अल्पेश अमीन यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App