वृत्तसंस्था
काबूल : ओसामा बिन लादेन याच्या नंतरचा अल कायदाचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर, आता अल कायदा संघटनेने नव्या म्होरक्याची निवड केली आहे. कुख्यात दहशतवादी सैफ अल आदेल हे त्याचे नाव आहे. अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. As soon as Al Zawahiri was killed, Saif Al Adel became the new leader of Al Qaeda
अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. आता अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर सैफ अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अलकायदाता आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी कारवाया करणार आहे.
कोण आहे सैफ अल आदेल?
सैफ अल आदेलचा जन्म 11 एप्रिल 1960 मध्ये झाला. सैफ अल आदेल हा इजिप्तचा रहिवासी आहे.
1998 मध्ये नैरोबी येथील अमेरिकन दूतावास आणि दार ए सलाम येथे बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात आदेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेकडून अल आदेलवर एक कोटी डाॅलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
अल आदेल अल कायदाच्या मजलिस ए शूरा आणि लष्करी समितीचाही सदस्य आहे.
सैफ अल आदेलने अल कायदाच्या दहशतवाद्यांना लष्करी आणि गुप्तहेरगिरीचे प्रशिक्षण दिले आहे.
ओसामा बिन लादेननंतर अल आदेलची हंगामी नेता म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अल कायदाचा प्रमुख म्हणून अल जवाहिरीची निवड झाली होती. जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल आदेल कडेच पुन्हा अल कायद्याची सूत्रे आली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App