वृत्तसंस्था
कीव्ह : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू बुधवारी झाल्याची बातमी आहे.पंजाब मधील बर्नाला जिल्ह्यातील चंदन जिंदल हा विद्यार्थी गेल्या चार वर्षापासून युक्रेन मध्ये शिकत होता. 2 फेब्रुवारीला तो आजारी पडला होता.Another student dies in Ukraine, but due to illness !
त्याच्यावर एक शस्त्रक्रिया देखील झाली होती. 7 फेब्रुवारीला त्याचे वडील आणि त्याचे काका त्याच्या समवेत राहण्यासाठी युक्रेनला गेले होते. परंतु उपचारादरम्यान चंदनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
चार मंत्री युक्रेन भोवतीच्या देशात
दरम्यान, युक्रेन मधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. हरदीप सिंग पुरी ज्योतिरादित्य शिंदे, व्ही. के. सिंग यांच्यासह चार मंत्री युक्रेन भोवतीचा देशांमध्ये तळ ठोकून आहेत. सर्व विद्यार्थ्यांशी या मंत्र्यांचा संपर्क झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. सुमारे 1000 विद्यार्थ्यांना घेऊन 4 मार्च रोजी 3 विमाने भारतात पोचण्याची ही माहिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App