कॅनडात आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड, खलिस्तानी अतिरेक्यांचे कृत्य


वृत्तसंस्था

टोरंटो : कॅनडामधील खलिस्तान समर्थक अतिरेक्यांनी आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे आणि भारतीय समुदायामध्ये भीती निर्माण करण्यासाठी कॅनडा-अमेरिका सीमेवर फ्रेझर नदीच्या दक्षिणेला असलेल्या सरे शहरातील एका मंदिराच्या मुख्य गेटवर पोस्टर चिकटवले आहेत.Another Hindu temple vandalized in Canada by Khalistani militants

पोस्टरमध्ये हरदीप निज्जरच्या हत्येबाबत सार्वमत घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ ने खलिस्तानींच्या कृत्याचा व्हिडिओदेखील ट्विट केला आहे, ज्यामध्ये दोन मास्क घातलेले खलिस्तान समर्थक मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोस्टर चिकटवताना दिसतात.



खलिस्तान समर्थक 18 जून रोजी या हत्याकांडातील भारताच्या भूमिकेच्या चौकशीसाठी जनमत चाचणी घेणार असल्याचे पोस्टरवर लिहिले आहे. पोस्टरवर जतिंदर हरदीप सिंह निज्जर याचे छायाचित्र चिकटवण्यात आले असून त्याला शहीद संबोधण्यात आले आहे.

18 जून रोजी खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. नुकतीच भारत सरकारने 41 दहशतवाद्यांची यादी जारी केली होती, त्यात हरदीप निज्जरचेही नाव होते.

सरे शहरातच निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तो कॅनडाच्या शिख फॉर जस्टिस शीख संघटनेशी संबंधित होता. निज्जर हा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो कॅनडामध्ये राहून खलिस्तान चळवळीला खतपाणी घालत होता.

Another Hindu temple vandalized in Canada by Khalistani militants

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात