इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, माजी परराष्ट्रमंत्री कुरेशींना निवडणूक लढवण्यास बंदी

गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी कुरेशी यांना नुकतीच 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयला सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. खरे तर इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या सरकारमधील परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी कुरेशी यांना नुकतीच 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशा स्थितीत पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार त्यांना पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. Another big blow to Imran Khan former Foreign Minister Qureshi banned from contesting elections

अलीकडेच, पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते आणि त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता न्यायालयाच्या त्या निर्णयाच्या आधारे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने कुरेशी यांच्यावर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, मखदूम शाह महमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या राज्यघटनेतील निवडणूक कायद्याच्या कलम 63(1) अंतर्गत निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. कुरेशी 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाग घेऊ शकणार नाहीत.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी, पीटीआयने आरोप केला आहे की त्यांचा पक्ष आणि त्यांच्या समर्थकांचा छळ केला जात आहे आणि त्यांना निष्पक्षपणे निवडणूक लढवू दिली जात नाही.

Another big blow to Imran Khan former Foreign Minister Qureshi banned from contesting elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात