woman got six doses of pfizer vaccine : इटलीमधील एका नर्सने नजरचुकीने महिलेला लसीचे सहा डोस एकाच वेळी दिले. ती महिला 23 वर्षांची आहे आणि तिला फायझर बायोनोटेक लसीचे सहा डोस देण्यात आले होते. लसीच्या एकाच डोसमुळे ताप, अंगदुखीचा त्रास, मग एकदम सहा डोस दिल्याने काय होईल, या भीतीने रुग्णालयाने 24 तास महिलेची देखरेख केली. an italian woman got six doses of pfizer vaccine see what Happened
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इटलीमधील एका नर्सने नजरचुकीने महिलेला लसीचे सहा डोस एकाच वेळी दिले. ती महिला 23 वर्षांची आहे आणि तिला फायझर बायोनोटेक लसीचे सहा डोस देण्यात आले होते. लसीच्या एकाच डोसमुळे ताप, अंगदुखीचा त्रास, मग एकदम सहा डोस दिल्याने काय होईल, या भीतीने रुग्णालयाने 24 तास महिलेची देखरेख केली.
सेंट्रल इटलीतील टस्कनी येथे नोआ हॉस्पिटलमध्ये महिला नर्सच्या नजरचुकीमुळे फायझर लसीचे एकदम सहा डोस देण्यात आले होते. रुग्णालयाच्या प्रवक्त्या डॅनिएला यांनी म्हणाल्या की, हा प्रकार लक्षात आल्यावर नर्सने महिलेला याची माहिती दिली व लसींचा काही विपरीत परिणाम होतो का हे पाहण्यासाठी 24 तास वैद्यकीय निगराणीची गरज सांगितली.
यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या प्रकृतीत काही बदल होतो, याचे बारकाईने निरीक्षण केले. तथापि, कोणताही दुष्परिणाम न आढळल्याने डॉक्टरांनी महिलेला रुग्णालयातून सुटी दिली आहे. डॉक्टरांच्या मते, लसीचा दुष्परिणाम तेवढा नसतो, परंतु ठरलेल्या मात्रेपेक्षा जास्त डोस घेणे अपायकारक ठरू शकतात. यामुळे एका वेळी एकच डोस सर्वांनी घेतला पाहिजे. व्यक्तिपरत्वे याचे वेगळेही परिणाम संभवतात.
वास्तविक, नर्सने जेव्हा पाच रिकाम्या सिरिंज पाहिल्या तेव्हा तिला तिची चूक कळली. आरोग्य कर्मचार्यांना इटलीमध्ये लस घेणे अनिवार्य केले आहे. ती महिला रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात एक इंटर्न होती. याप्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यात आली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. रुग्णालयाचे मते, हेतुपुरस्सर हे केलेले नाही. एप्रिलच्या सुरुवातीस इटालियन सरकारने आरोग्य कर्मचारी आणि फार्मसी कर्मचार्यांना लसी देणे बंधनकारक केले आहे.
an italian woman got six doses of pfizer vaccine see what Happened
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App