पलटवार : जेपी नड्डांचे सोनियांना पत्र, म्हणाले- महामारीच्या काळातील काँग्रेसचे वागणे जनता विसरणार नाही!

JP Nadda's reply to Sonia Gandhi, said People will not forget the behavior of Congress in the epidemic

JP Nadda’s reply to Sonia Gandhi : कोरोना महामारीचा देशात उद्रेक सुरू असतानाच कोरोनावरील राजकारणही तेजीत आहे. महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांवर विरोधकांनी टीका केली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत महामारीवरून केंद्रावर केलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उत्तर दिले आहे. जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पक्षाच्या बैठकीत कोरोनावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. JP Nadda’s reply to Sonia Gandhi, said People will not forget the behavior of Congress in the epidemic


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा देशात उद्रेक सुरू असतानाच कोरोनावरील राजकारणही तेजीत आहे. महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांवर विरोधकांनी टीका केली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत महामारीवरून केंद्रावर केलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उत्तर दिले आहे. जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पक्षाच्या बैठकीत कोरोनावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.

जेपी नड्डा यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, सध्याच्या संकटाच्या काळात कॉंग्रेसच्या आचरणाने मला दु:ख झाले आहे, पण आश्चर्य वाटले नाही. त्यांनी पत्रात लिहिले की, तुमच्याच पक्षातील काही लोक सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचे कौतुकास्पद काम करत आहेत, परंतु पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नकारात्मकतेमुळे त्यांची मेहनत वाया जाते आहे.

अवघा देश एकीकडे कोरोना महामारीच्या खतरनाक लाटेशी झुंज देतोय, अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकांना चुकीची माहिती देणे, विनाकारण घाबरवून सोडणे असे प्रकार थांबवतील का? जेपी नड्डा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपचे सरकार आहे तेथे आम्ही गरीब व वंचितांना मदत करण्यासाठी मोफत लस जाहीर केली आहे.

जेपी नड्डा यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, कॉंग्रेस त्यांच्या राज्यात अशा लोकांना मदत करण्यासाठी मोफत लस जाहीर करेल का? दरम्यान, सोमवारी पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत सोनिया गांधींनी कोरोना महामारीवरून मोदी सरकारवर टीका केली होती. काँग्रेसच्या वर्किंग कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही चर्चा झाली. यावेळी सोनिया गांधींनी पक्षात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.

JP Nadda’s reply to Sonia Gandhi, said People will not forget the behavior of Congress in the epidemic

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय