हमासने कंडोम बॉम्बचा वापर सुरू केल्याने इस्त्रालयनेही आता त्याला एअर स्ट्राईकने उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत.
Air strikes from Israel respond to Hamas condom bombings
विशेष प्रतिनिधी
तेल अवीव : हमासने कंडोम बॉम्बचा वापर सुरू केल्याने इस्त्रालयनेही आता त्याला एअर स्ट्राईकने उत्तर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत.
मे महिन्यात लागू झालेल्या शस्त्रसंधीनंतर दोन्ही बाजूने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली जात आहे. हमासकडून सुरू असलेल्या कंडोम बॉम्बच्या हल्ल्यांना इस्रायलकडून एअर स्ट्राइकद्वारे प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पॅलेस्टाइनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा शहरातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यात एका प्रशासकीय इमारतीचे नुकसान झाले.
हमासने गाझा शहरात इस्रायलचे एक ड्रोन विमान पाडले. हमासने मशीनगनमधून इस्रायलच्या बाजूने गोळीबार केला. त्यामुळे इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले, असा दावाही स्थानिक माध्यमांनी केला आहे.
हमासच्य सदस्यांकडून इस्त्रायलवर कंडोम बॉम्ब सोडले जात आहेत. यामध्ये निरोधचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. निरोधमध्ये हवा भरून त्यामध्ये कोळसा व इतर ज्वलनशील पदार्थ, स्फोटके भरून इस्रायलच्या हद्दीत सोडली जात आहेत. ज्या भागात हे फुगे फुटतात, त्या ठिकाणी स्फोट होतात आणि आग लागते. या बॉम्बमुळे इस्रायलमधील हजारो एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून इस्त्रायलने प्रत्युत्तरात हवाई हल्ले केले. मागील महिन्यात २१ मे रोजी इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये शस्त्रसंधी झाली होती.
फक्त निरोध नव्हे तर घरी तयार करण्यात येणाºया पतंगाद्वारेही हमास इस्रायलमध्ये स्फोट घडवतात. पतंगांमध्ये स्फोटके लावलेली असतात. पतंग पडल्यानंतर त्या भागामध्ये आग लागते. हमासकडून सोडण्यात येणाºया फुग्यांवर, निरोधवर अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिलेल्या असतात. काही फुग्यांवर आय लव्ह यू सारखे संदेशही लिहिलेले असतात. जेणेकरून लोकांनी स्फोटके असलेले फुगे पकडावीत आणि त्याचा स्फोट व्हावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App