विशेष प्रतिनिधी
ढाका : बांग्लादेशातील कट्टरपंथियांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर चढवला आहे. येथील २०० हून अधिक जणांच्या एका जमावाने गुरुवारी राजधानी ढाक्यातील इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला करुन प्रचंड तोडफोड व लूटमार केली. त्यात ३ भाविक जखमी झालेत. हल्लेखोरांचे नेतृत्व हाजी शफीउल्लाह करत होता. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात घबराट पसरली आहे.After Kashmir Files, now Dhaka Files, once again extremists attack Hindu temple, ISKCON Radhakanta temple vandalized
इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी एका ट्विटद्वारे डोल यात्रा व होळी समारंभाच्या पूर्वसंध्येला झालेली ही घटना अत्यंत दुदैयर असल्याचे सांगत म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र हजारो असहाय्य बांग्लादेशी व पाकिस्तानी अल्पसंख्यकांच्या वेदनांवर शांत असल्याचे पाहूने आश्चर्य वाटते. एवढ्या मोठ्या हिंदू अल्पसंख्यकांनी आपले प्राण व संपत्ती गमावली. पण, त्यानंतरही संयुक्त राष्ट्राचे मौन सुटत नाही.
गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास २०० जणांच्या जमावाने मंदिरावर हल्ला करुन लूटमार केली.राधारमण दास म्हणाले, काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्राने इस्लामोफोबियाचा निपटारा करण्यासाठी 15 मार्च हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पारित केला.
आश्चर्य म्हणजे हाच संयुक्त राष्ट्र हजारो असहाय्य बांग्लादेशी व पाकिस्तानी अल्पसंख्यकांच्या वेदनांवर मौन बाळगत आहे. द काश्मीर फाईल्सने हिंदूंना जागे केले असून, आता कुणीही झोपू नकागेल्या वर्षी दुर्गा पूजेच्या वेळी चांदपूर जिल्ह्यात जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला केला होता.
त्यात ३ जणांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बांग्लादेश हिंदू यूनिटी काउंसिलने पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हिंदूंना सुरक्षा उपलब्ध करवून मागणी केली होती.
भारतातील बाबरी मशिदीच्या विध्वंसापूर्वीच 29 ऑक्टोबर 1990 रोजी जमात ए इस्लामी नामक संघटनेने बांग्लादेशात बाबरी मशिद पाडल्याची अफवा पसरवली होती. यामुळे 30 ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर १९९० पर्यंत तिथे मोठा हिंसाचार झाला होता. त्यात अनेक हिंदू मारले गेले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App