इस्रायलने गाझामधील हॉस्पिटलवर केलेल्या हवाई हल्ल्यात, ५०० जणांचा मृत्यू – हमासचा दावा

…तर २००८ नंतरचा हा सर्वात प्राणघातक इस्रायली हवाई हल्ला असेल

विशेष प्रतिनिधी

हमास आणि इस्रायलमधील युद्ध 11 व्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, हमासने मोठा दावा केला आहे. मंगळवारी (17 ऑक्टोबर) रात्री 10:30 च्या सुमारास हमासने सांगितले की, इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. 500 killed in Israeli airstrikes on hospital in Gaza  Hamas claims

न्यूज एजन्सी एपीच्या मते, या हल्ल्याची पुष्टी झाल्यास 2008 नंतरचा हा सर्वात प्राणघातक इस्रायली हवाई हल्ला असेल. एपीच्या मते, अल अहली हॉस्पिटलच्या फोटोंमध्ये हॉस्पिटलचे हॉलला आग, तुटलेल्या काचा आणि विकृत मृतदेह दिसले.शेकडो मृत्यूमागील एक प्रमुख कारण म्हणजे गाझामधील अनेक रुग्णालये लोकांसाठी आश्रयस्थान बनली आहेत. याआधी इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन दिसून आले.

दरम्यान, इस्रायलमधील तेल अवीव आणि अश्कलोन या शहरांमध्ये सायरनचे आवाज ऐकू आले. हमासने तिथे रॉकेट डागले आहेत. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या अतिरेकी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू झाले होते. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 4700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

500 killed in Israeli airstrikes on hospital in Gaza  Hamas claims

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात