विशेष प्रतिनिधी
चेन्नई : भारतीय सॉफ्टवेअर प्रॉडक्शन कंपनी फ्रेशवर्क्सचे 500 कर्मचारी एका क्षणात करोडपती झालेत. अमेरिकन स्टॉक एक्सचेंज नॅसडॅकवर फ्रेशवर्क्सचे शेअर्स लिस्ट केले गेले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना मिळालेल्या शेअर्सच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. कंपनीने आयपीओद्वारे 1.03 अब्ज डॉलर्स उभारले आहेत. तामिळनाडूतील त्रिची या शहरात 700 चौरस फुटांच्या गोदामात या कंपनीची सुरुवात झाली होती. चेन्नई, भारत आणि कॅलिफोर्निया, यूएसए येथे त्यांनी आता ऑफिसेस चालू केले आहेत.
500 employees became millionaires! Indian software production company Freshworks listed on the US stock market
फ्रेशवर्क्स ही पहिली भारतीय सॉफ्टवेअर प्रॉडक्शन कंपनी आहे जी यूएस नॅस्डॅक स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. फ्रेशवर्क्सची स्थापना 2010 मध्ये चेन्नईमध्ये झाली. त्याचे पूर्वीचे नाव फ्रेशडेस्क होते. 2017 मध्ये त्याचे नामकरण फ्रेशवर्क्स असे करण्यात आले. नॅसडॅकच्या लिस्ट मध्ये फ्रेशवर्कच्या शेअर ची किंमत $ 36 प्रति शेअर इतकी होती. यानंतर यांच्या किंमतीत 25% ची वाढ झाली. ह्या वाढी नंतर फ्रेशवर्कच्या शेअर ची किंमत $ 48 प्रति शेअर इतकी झाली. यामूळे कंपनीचे मार्केट कॅप $ 13 अब्ज पर्यंत वाढले. ज्यामुळे कर्मचार्यांना मिळालेल्या शेअर्सच्या किंमती देखील वाढल्या. कंपनीने IPO मध्ये 2.85 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. एका शेअरची किंमत $ 36 निश्चित करण्यात आली होती.
Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश मातृबुथम म्हणाले की, या लिस्टिंगमुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना एक्सेल आणि सेक्वॉयाचा खूप फायदा झाला आहे. यासह कंपनीचे सुमारे 500 कर्मचारी करोडपती झाले आहेत. ते म्हणाले की कंपनीचे कर्मचारी आणि गुंतवणूकदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ज्याचा त्यांना आता फायदा झाला आहे. आता सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे माझी एक नवीन जबाबदारी आहे. कारण या लोकांनी कंपनीच्या भविष्यातील संभाव्यतेमध्ये गुंतवणूक केली आहे.
फ्रेशवर्क्स, इन्फोसिस, विप्रो, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅब या कंपन्या या यादीत सामील झाल्या आहेत. हे सर्व अमेरिकेच्या नॅस्डॅक एक्सचेंजच्या लिस्ट मध्ये आहेत तर इन्फोसिस कंपनी नास्डॅक एक्सचेंजच्या लिस्ट मध्ये आधीपासूनच म्हणजे 1999 पासून आहे.
कंपनीच्या 76% कर्मचाऱ्यांकडे शेअर्स आहेत. 76% कर्मचारी म्हणजे एकूण 4,300 लोक होय. लक्षाधीश झालेल्या 500 कर्मचाऱ्यांपैकी 70 जणांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. हे कर्मचारी काही वर्षांपूर्वी महाविद्यालयीन पदवी पूर्ण केल्यानंतर कंपनीत रुजू झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App