वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील स्थिती महाभयानक अवस्थेत पोचली आहे. तेथे तालिबानी राजवटीचे हस्तक तरुण मुलांचे अपहरण करत आहेत. त्यांना पाकिस्तानात नेऊन तिथल्या तरुण मुलींशी लग्न लावत आहेत. अफगाणिस्तानात आणून त्यांना बुरख्यात अडकवले जात आहे. कोणाचेही नातेवाईक तिथे सुरक्षित नाहीत. तिथली कोणतीही खबरबात अधिकृतरित्या बाहेर पोहोचवली जात नाही, अशा शब्दांत दिल्लीत राहणारा अफगाण तरुण हिजबुल सिद्दीकी याने त्याच्या देशाच्या सद्यस्थितीचे वर्णन केले आहे. spoken with my parents and brother for 3-4 months, unaware of their whereabouts. They live in a village, and network connectivity is poor there.
हिजबुल सिद्दीकीचे सर्व नातेवाईक अफगाणिस्तानातील हेरत प्रांतात ग्रामीण भागात राहतात. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्याचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. तो गेली चार वर्षे दिल्लीत वास्तव्यास आहे.
I'm living in India for past 4 years. Present situation in Afghanistan is disturbing. I've been told that the Taliban is abducting young boys, taking them to Pakistan, marrying young girls&forcing them to wear hijab (veil). Girls can't walk around freely now:Hasibullah Siddiqui pic.twitter.com/2fA5RfXxbF — ANI (@ANI) August 13, 2021
I'm living in India for past 4 years. Present situation in Afghanistan is disturbing. I've been told that the Taliban is abducting young boys, taking them to Pakistan, marrying young girls&forcing them to wear hijab (veil). Girls can't walk around freely now:Hasibullah Siddiqui pic.twitter.com/2fA5RfXxbF
— ANI (@ANI) August 13, 2021
तो म्हणाला, की गेल्या चार – पाच महिन्यांमध्ये मी माझ्या भावांशी किंवा आई-वडिलांची बोलू शकलेलो नाही. ते सध्या नेमके कुठे आहेत हे मला माहिती नाही. हेरत प्रांतात कनेक्टिव्हिटी आणि एकूणच संपर्क व्यवस्था अतिशय क्षीण आहे. त्यात तालिबानच्या राजवटीने तर संपूर्ण संपर्क व्यवस्था ठप्प करून ठेवली आहे. तिथे कोणीही कोणाला भेटू शकत नाही.
तालिबान राजवटीने महिलांवर पुन्हा जुनेच निर्बंध लादण्यात आले आहेत. महिला कुठेही मोकळेपणाने फिरू शकत नाहीत. त्यांच्या सुरक्षेची कोणीही गॅरेंटी घेऊ शकत नाही. तालिबान अफगाणिस्तानला पुन्हा मध्ययुगीन कालखंडात लोटत आहे. हे सगळे माझ्यासाठी अतिशय दुःखकारक आहे. मी इथे भारतात सुरक्षित आहे. स्वातंत्र्य उपभोगतो आहे. परंतु माझे नातेवाईक कुठे आहेत याची मला माहिती नाही. ते सुरक्षित आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही, अशा भावना हिजबुल सिद्दीकी याने व्यक्त केल्या आहेत.
spoken with my parents and brother for 3-4 months, unaware of their whereabouts. They live in a village, and network connectivity is poor there.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App