विशेष प्रतिनिधी
पुणे : एक्सप्रेस हायवे वर भर दिवसा एका अभिनेत्याला लुटण्यात आले. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या योगेश माधव सोहनी (वय ३२, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) यांच्यावर हा प्रसंग ओढवला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (शिरगाव चौकी) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The actor in the series ‘Mulgi Jhali Ho’ was robbed on the express highway
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहनी हे एक्सप्रेस हायवे वरून पुण्याकडे जात होते या वेळी सोमाटणे एक्झिटजवळ एक पांढऱ्या रंगाचे काळ्या काचा असलेले चारचाकी वाहन तेथे आले. त्या वाहनाच्या चालकाने हात दाखवून सोहनी यांना थांबण्याचा इशारा केला.
त्यामुळे फिर्यादी सोहनी यांनी गाडी थांबवली. तुझ्या गाडी मुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताचे कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायचे नसेल तर तू एक लाख पंचवीस हजार रुपये नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल, असे सांगून आरोपी वाहन चालकाने फिर्यादी सोहनी यांना भिती दाखवली. तसेच आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी ही केली. त्यानंतर सोमाटणे फाटा येथील एटीएममधून ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडून फिर्यादी सोहनी यांच्याकडून ती रक्कम घेऊन निघून गेला.
दरम्यान, पैसे घेऊन आरोपी लागलीच निघून गेल्याने फिर्यादी सोहनी यांना संशय आला. तसेच काही जणांकडून माहिती घेतली असता एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला नसल्याचे फिर्यादी सोहनी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सोमवारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी सुरू केली आहे.
‘मुलगी झाली हो मालिकेतील व’शौनक जागीरदार’ ही भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनी यांनी यापूर्वीही काही वेबसिरीज तसेच मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App