पनवेलमध्ये रिक्षा चालवली म्हणून अभिनेता सलमान खान झाला ट्रोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नुकताच अभिनेता सलमान खानने आपला वाढदिवस साजरा केला होता. पनवेलच्या फार्म हाऊसवर सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड चिंता होती. तसेच सलमानला साप चावल्यामुळे बरेच मजेशीर मीम देखील इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

Actor Salman Khan got trolled as he drove a rickshaw in Panvel

सलमान खान आता आणखी एका गोष्टीसाठी ट्रोल होतोय. सर्पदंश झाल्या नंतर बरे होऊन त्याने आपल्या घरच्यांसोबत आपला वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवर सेलिब्रेट केला. आपल्या वाढदिवसानंतर त्याने पनवेलच्या रस्त्यावरून रिक्षा चालवली. आणि सलमान खान रिक्षा चालवतोय हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.


Salman Khan Birthday: ‘एकदा नाही तर तीनदा चावला विषारी साप’ ! स्वतः सलमानने सांगितला परवाचा किस्सा …


तर नेटकर्यांनी सलमानला पुन्हा एकदा ट्रोल करण्याचे ठरवले आहे. कारण बऱ्याच वर्षा पूर्वी ड्रिंक अँड ड्राईव्ह केस मध्ये तो अडकला होता. सलमान खानच्या गाडीच्या खाली येऊन काही लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. त्या नंतर कोर्टात ह्या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा सलमान गाडी चालवत न्हवता असे सिद्ध झाले होते त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

त्यामुळेच नेटकऱ्यांची आता नेमके कोणाला उडवणार? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत या व्हिडीओला प्रचंड ट्रोल केले आहे.

Actor Salman Khan got trolled as he drove a rickshaw in Panvel

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात