कोरोनाचे संकट टळले नसले तरीही व्यापार वाढेल; जागतिक व्यापार संघटनेचा आशावाद


वृत्तसंस्था

फ्रँकफर्ट : कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात जागतिक व्यापाराला मोठा फटका बसल्यानंतर चालू वर्षांत व्यापारात पुन्हा वाढ होण्याची शक्यता जागतिक व्यापार संघटनेने (डब्लूटीओ) व्यक्त केली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसल्याने अपेक्षित वाढीवरही विपरित परिणाम होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. WTO hopes increase in world trade



गेल्या वर्षी जागतिक व्यापार ५.३ टक्क्यांनी घटला होता. चालू वर्षांत त्यात ८ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ‘डब्लूटीओ’ला आहे. त्यापुढील वर्षांत वाढीचा वेग ४ टक्क्यांनी पुन्हा कमी होऊ शकते. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात जगातील बहुतेक व्यवहार बंद पडल्याने व्यापारात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, अनेक देशांनी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी प्रचंड पैसा ओतल्याने घट अपेक्षेपेक्षा कमी झाली.

आता व्यापाराला वेग आल्याने त्यात वाढ होण्याचा अंदाज ‘डब्लूटीओ’ने व्यक्त केला आहे. मात्र, लसीकरणात शिथिलता, प्रादेशिक वाद आणि कमजोर झालेले सेवा क्षेत्र यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याचे या संघटनेने म्हटले आहे. संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी लशीच्या रुपाने चांगली संधी जगासमोर आली आहे. मात्र, लस वितरणाच्या बाबतीत गरीब आणि श्रीमंत देशांमध्ये तफावत असून हा भेद दूर करेपर्यंत धोका कायम राहणार असल्याचे ‘डब्लूटीओ’ने म्हटले आहे.

WTO hopes increase in world trade

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात