महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे देशातील उद्योगाला मोठा फटका, गेल्या दहा दिवसांत देशात ४६ हजार कोटी रुपयांचे नुकसान


कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय मानून केवळ नाव बदलून निर्बंध लावल्याने महाराष्ट्राच्या उद्योग व्यापाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील ४६ हजार कोटी रुपयांच्या व्यापाराला फटका बसला आहे. महाराष्ट्रात १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. Restrictions in Maharashtra hit the country’s industry hard, with a loss of Rs 46,000 crore in the last ten days


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय मानून केवळ नाव बदलून निर्बंध लावल्याने महाराष्ट्राच्या उद्योग व्यापाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील ४६ हजार कोटी रुपयांच्या व्यापाराला फटका बसला आहे. महाराष्ट्रात १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) दिलेल्या माहितीनुसार देशातील ३२ हजार कोटी रुपयांचा होलसेल व्यापार आणि १४ हजार कोटींच्या किरकोळ व्यापाराला फटका बसला आहे. याचे कारण कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे म्हणजे साठ टक्के ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. यामधील सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील आहे.



राज्यातील १० हजार कोटी रुपयांच्या किरकोळ तर चार हजार कोटी रुपयांच्या होलसेल व्यापाराला फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांत कठोर निर्बंध लावल्याने व्यापार-उद्योग बंद झाला आहे.

महाराष्ट्रालगतचे राज्य असलेल्या छत्तीसगडमध्येही १२०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. गुजरातमधील व्यापाराला किरकोळ व्यापाराला ४ हजार ८०० कोटी रुपयांचा तर होलसेल व्यापाराला २२०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दिल्लीमध्ये किरकोळ व्यापाराला ३ हजार कोटी रुपयांचा तर होलसेल बाजाराला १४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोनाविरुध्दच्या लढाईत लॉकडाऊनचाच विचार करू नका. त्याऐवजी सुरक्षेचे नियम पाळा. लसीकरण मोहीम अधिक गतिमान करा असे आवाहन उद्योगजगताकडून करण्यात आले आहे.

Restrictions in Maharashtra hit the country’s industry hard, with a loss of Rs 46,000 crore in the last ten days

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात