मार्चमध्ये GSTचे बंपर कलेक्शन, जीएसटीच्या इतिहासातील सर्वाधिक कर झाला जमा

GST collection in March, the highest tax collection in the history of GST

GST collection in March : आर्थिक वर्ष 2021-21च्या अखेरच्या महिन्यात जीएसटी संकलन 1.23 लाख कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर त्यात 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ही माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे गेला आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. हा डेटा स्पष्टपणे दर्शवितो की, अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असून त्यामुळे जीएसटी संकलनात वाढ सुरू आहे. GST collection in March, the highest tax collection in the history of GST


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-21च्या अखेरच्या महिन्यात जीएसटी संकलन 1.23 लाख कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर त्यात 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ही माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे गेला आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. हा डेटा स्पष्टपणे दर्शवितो की, अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असून त्यामुळे जीएसटी संकलनात वाढ सुरू आहे.

मार्च 2021 मध्ये एकूण जीएसटी संकलन (GST collection in March) 1,23,902 कोटी रुपये होते. त्यापैकी केंद्रीय जीएसटी 22,973 कोटी रुपये, राज्य जीएसटी 29,329 कोटी आणि एकात्मिक जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. जीएसटी सुरू झाल्यापासून मार्च महिन्यात जीएसटी संकलन सर्वाधिक झाले आहे. मार्च 2020 मध्ये ते 97,590 कोटी होते. यावर्षी जानेवारीत जीएसटी संकलन 1,19,875 कोटी रुपये होते. आणि फेब्रुवारीमध्ये ते 1,13,143 कोटी रुपये होते.

राज्यांची 63 हजार कोटींची थकबाकी

अर्थ मंत्रालयाने मंगळवारी म्हटले की, 27 मार्च रोजी केंद्राने जीएसटी भरपाई म्हणून 30,000 कोटी रुपये राज्यांना दिले. चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे 63,000 कोटी रुपये प्रलंबित आहेत. वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरपाईच्या मुदतीच्या अंतर्गत 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत 70,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात जीएसटी संग्रहणातील कपात भरून काढण्यासाठी विशेष कर्ज योजनेंतर्गत राज्यांना देण्यात आलेल्या 1.10 लाख कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त ही रक्कम आहे.

केंद्राने राज्यांना आतापर्यंत 70 हजार कोटी दिले

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “केंद्र सरकारने 27 मार्च रोजी 2020-21 पर्यंत राज्यांना जीएसटी भरपाई म्हणून 30,000 कोटी रुपये दिलेले आहेत. या आर्थिक वर्षात नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत एकूण 70,000 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी 14,000 कोटी रुपये राज्य व केंद्र यांच्यात समान प्रमाणात सामायिक केले गेले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “जीएसटी भरपाई, कर्ज आणि आयजीएसटी सेटलमेंटचा आढावा घेतल्यानंतर आतापर्यंत 2020-21 साठी जीएसटी भरपाई वस्तूंमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 63 हजार कोटी रुपयांची रक्कम देणे बाकी आहे.”

GST collection in March, the highest tax collection in the history of GST

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात