मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हत्यार घेऊन मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचले असले आणि त्यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाचा एल्गार केला असला तरी जरांगे यांच्या आंदोलनाची वेगवेगळी वळणे आणि वळसे पाहता, तीन टार्गेट्स असल्याचे लक्षात येते. मराठा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या आवरणाखाली राजकीय आरक्षण साध्य करून घेणे, देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला हटविणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या हातात संपूर्ण महाराष्ट्र सोपविणे ही तीन टार्गेट्स आहेत. शरद पवारांच्या राजकीय भूमिका बदलांशी अनुकूल ठरणारी टार्गेट्स जरांगेंना त्यांनी दिली आहेत.
कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!! बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या नेत्यांनी त्या आंदोलनात घुसखोरी केली आहे. पण त्याचवेळी पवार आणि ठाकरे यांची ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका मात्र संशयाच्या घेऱ्यात आली आहे
जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनासाठी खानावळी; डॉ. मोहन भागवत यांनी सांगितली त्यांची कहाणी!!, असे आज राजधानी नवी दिल्लीत घडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.
गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!, असेच चित्र ठाकरे बंधूंच्या आजच्या तिसऱ्या भेटीवरून दिसून आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनाला गेले. त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे अर्थातच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही होते. दोन्ही बंधूंनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांनी बसविलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. पण प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांच्या चित्रासमोर फोटोला पोज देताना दोन्ही बंधूंनी आपापली हातांची घडी घातलेली दिसली.
विशेष प्रतिनिधी पुणे:Ganesh festival in other parts of the world : गणेशोत्सव हा भारतातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे, जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल […]
महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते.
विशेष प्रतिनिधी दिल्ली : Prime Minister Narendra Modi’s visit to Japan and China : पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 ऑगस्ट 2025 रोजी जपानच्या दौऱ्यावर […]
मराठा आरक्षणाचे आंदोलन करताना मनोज जरांगे श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात काही बोलत नाहीत. तेच मराठा आरक्षणातले खरे अडथळा आहेत.
सगळ्या देशभरात आणि अगदी परदेशातही सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे त्याचवेळी राहुल गांधी + मनोज जरांगे + तेजस्वी यादव आणि एम. के. स्टालिन यांनी वेगवेगळ्या आंदोलनांची टूम काढली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लागोपाठ दुसरा धक्का दिला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर 50 % टेरिफ लादायची दमबाजी; पण अमेरिकन दूतावासाकडून भारताची मनधरणी!!
चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती!!, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय प्रवास झालेला दिसतोय. तो “अत्यंत वेगवान” आहे. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत एवढा वेगवान राजकीय प्रवास केलेला राष्ट्राध्यक्ष सापडणे कठीण आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनाचा सूत्रपात केला असला, तरी संघाने तेवढ्यापुरताच शताब्दी वर्षाचा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही.
ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून थेट मुंबई गाठायचा बेत केलेल्या मनोज जरांगे यांनी आज अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातले फडणवीस सरकार उलथवण्याची भाषा केली.
एकीकडे राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे मतदार अधिकार यात्रा; त्याचवेळी काँग्रेसच्या आमदाराने बोलून दाखवली कर्नाटकातली पक्षाची हतबलता!!, हा असला राजकीय काय आज एकाच दिवशी घडला.
आतापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची घुसखोरी भारतात होत होती. पण आता त्यात बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भर पडली असून बांगलादेशातला वरिष्ठ पोलीस अधिकारी आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी केली. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने त्याला पकडला. पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आज बशीरहाट न्यायालयाने आरिफ उज जमान याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??
हातात लाल संविधान घेऊन आणि मुखात लोहिया + मधू लिमये यांच्या गोष्टी सांगत INDI आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी करायची असल्याचा दावा केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने एक व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन जो शक्ती संवाद सुरू केलाय, त्याचा दुसरा उपक्रम मुंबईत होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्ती संवादाच्या निमित्ताने झालेले चिंतन महिलाविषयक धोरणात परावर्तित करण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद नावाचा उपक्रम हाती घेऊन त्याचा दुसरा उपक्रम आज पासून दोन दिवस मुंबईत आयोजित केला.
शरद पवारांचा INDI उमेदवाराला पाठिंबा; पण त्यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, असे “पवार बुद्धीचे” तिरके राजकारण आज एकाच दिवशी घडले.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना “चोर” शब्दाचे एवढे आकर्षण का आहे??, नेमकं रहस्य काय आहे??, असे सवाल काँग्रेसच्या नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांमधल्या वर्तणुकीतून आणि राजकीय वक्तव्यातून समोर आलेत.
सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App