मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नायक ग्रंथात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी फडणवीसांची स्तुती करणारा लेख लिहिला. देवेंद्र यांची कार्याची गती अफाट आहे
“पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या आणि भाजपने सत्तेबाहेर ठेवलेल्या पवार संस्कारितांची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!, असे म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे आली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशन काळात फडणवीस सरकारला अडचणीत आणायची संधी विरोधकांना पुरती साधता आली नाही
ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल की नाही याची नाही खात्री; पण अमित शाहांनी फडणवीसांना केलेल्या सूचनांची संजय राऊतांकडे “पक्की माहिती”!!, असला प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातून समोर आला.
: ठाकरे बंधूंचे ऐक्य असो किंवा दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण असो हे दोन्ही निर्णय ठाकरे किंवा पवार यांनी स्वतंत्रपणे घेण्यासारखे उरलेलेच नाहीत. ते निर्णय घेणे किंवा न घेणे हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या हातात जाऊन बसलेत.
ठाकरे बंधूंना भाजपचा मुद्द्यांचा इंधन पुरवठा; राजकारणाच्या या धबडग्यात काँग्रेस आणि पवारांना आपल्या पक्षांमध्ये नेते टिकवता येईनात!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झालीय.
बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…, हे शीर्षक काही सहज सुचलेले नाही.
केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलवण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस – राष्ट्रवादीत संघर्ष!!, असे एकमेकांशी विसंगत राजकीय चित्र आज समोर आले.
बैल गेला अन् झोपा केला, या मराठी म्हणीचा प्रत्यय आज आला. महाराष्ट्र विधानसभेने अख्खे जनसुरक्षा विधेयक संमत केले, त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी त्याच्या विरोधात थोडीफार भाषणे केली, पण त्याला कसून विरोध का केला नाही??
2024 च्या लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोन नेते “अचानक” एकत्र आले होते. त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीची घोषणा देखील केली होती. ती माध्यमांच्या पडद्यांवर आणि वर्तमानपत्रांच्या कागदावर उतरली, पण प्रत्यक्षात ती युती कधी झालीच नाही आणि तिचे राजकीय अस्तित्व कधी दिसलेच नाही.
जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
हो, नाही करता करता अखेर जयंत पाटलांनी 2633 दिवसांनी पद सोडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. 2 खासदारांचा भाजप मोठा होऊ शकतो
भाजप मधल्या टॅलेंट ची सुप्रिया सुळेंना चिंता;; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला उपयोग का होईना??, असा सवाल सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याविषयी संभ्रम वाढला असून त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात शरद पवारांच्या घरातूनच दोन परस्पर विरोधी वक्तव्ये समोर आली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ येणार का??, असा सवाल विचारायची वेळ खुद्द अजित पवारांच्या वक्तव्याने आली.
बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!, अशी बिहार राज्यातली अवस्था झाली आहे.
राष्ट्रपतींनी आज 4 महनीय व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली असली, तरी खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीतली चुरस पुढच्या वर्षी 2026 मध्ये होणार आहे
दहशतवाद्यांना धडकी भरवणारे वकील उज्ज्वल निकम, केरळमध्ये मार्क्सवाद्यांविरुद्ध प्रचंड संघर्ष करणारे सदानंद मास्टर, इतिहासकार मीनाक्षी जैन आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रांग्रीला यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर निवड केली.
महाराष्ट्रातल्या महापालिका जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत, 2025 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत घ्यावा लागणार हे लक्षात घेऊन महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापली राजकीय बांधबंदिस्ती सुरू केली, पण यातला महायुतीचा खरा फॉर्म्युला कुणीच सांगितला नाही, तो म्हणजे ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!, हा तो फॉर्म्युला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आज सकाळपासून दुपारपर्यंत सगळ्या महाराष्ट्रभर फिरल्या. त्यानंतर बराच वेळाने शरद पवारांनी कालच नेमलेले राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला. करून जयंत पाटील आजही प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या चालवायला लावून कुणीतरी खोडसाळपणा केला, असा राग काढला.
मोहन भागवत आणि मोदींना VRS घ्यायचा सल्ला; पण सल्लागारांना लोकांनीच CRS देऊन ठंडा केलाय मामला!!, अशी खरं म्हणजे संघ + भाजप काँग्रेस आणि उबाठा असल्या पक्षांची अवस्था झाली आहे.
75 ची रिटायरमेंटची शाल, मोहन भागवतांचे शालजोडीतले उद्गार आणि त्या पलीकडचा खरा स्थित्यंतराचा विचार!!, हे काही सहज सुचलेले शीर्षक नाही.
मोदी + शाहांना विरोधकांचा रिटायरमेंटचा सल्ला; पण स्वतःचे घरगुती पक्ष कुरकुरत चालवा!! असे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच विरोधी पक्षांची अवस्था झालीय.
शिक्षकांच्या आंदोलनात पवार + ठाकरेंची राजकीय घुसखोरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पुरती पोलखोल केली!!, असे आज विधान परिषदेत घडले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App