महाराष्ट्रात सगळीकडे भाजपची दादागिरी सुरू असताना मुंबई महानगरात मात्र उद्धव ठाकरेच ठरले इतरांवर भारी, उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात इतर सगळ्या पक्षांवर मारली बाजी!!, हे राजकीय चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले.
मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये युती तुटली. कारण भाजप आणि शिवसेना यांना स्वबळाची खुमखुमी आली.
आमदार खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली जाणार नाहीत असे धोरण भाजपने नाशिक मध्ये जाहीर केले.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे. कारण एकेका प्रभागात चार सक्षम उमेदवार आणायचे कुठून??, या सवालाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्यासारखे सगळे छोटे पक्ष आणि त्यांचे नेते हैराण झालेत.
शरद पवारांच्या कोलांट उड्यांचे गौतम अदानींच्या डोक्यावर खापर; “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड!!, हेच राजकीय चित्र या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दिसले. शरद पवार गौतम अदानींना फक्त 25 कोटी रुपयांमध्ये “पटले”, हे काही पवार बुद्धीच्या पत्रकारांना पटले नाही. गौतम अदानींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्या देणगीतून “शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स” उभे राहिले आणि त्याच्या उद्घाटनाला पवारांनी गौतम अदानींना बोलावले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे आणि काँग्रेसच्या निर्णय असा झाला, की आधी पवार काका – पुतण्यांच्या पक्षांच्या यशात पाचर मारायची, नंतर भाजपशी लढत द्यायची!!.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था एखाद्या लटकत्या खेळण्यासारखी झाली. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा सहा पट कमी लेखले.
महाराष्ट्रात फार मोठा राजकीय संगर होऊन ठाकरे बंधू ठरले लढवय्ये; पण शरद पवार ठरले पुतण्या पुढे शरणागत!!, हेच राजकीय वास्तव चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आज समोर आले.
मुंबई, पुणे, नाशिक यांच्यासह बहुतेक महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे कुठल्याही पक्षात विलीनीकरण झाले नाही, तर त्यांनी स्व हस्ते पक्षाची वाताहत करून घेतली. यशवंतराव चव्हाण यांनी दिग्गज नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.
पवार काका – पुतण्यांची युती फिसकटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकण्याची तयारी!!, हे राजकीय चित्र पुण्यातून समोर आले. जपने अजितदादांना महायुतीतून दूर सारल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडले, पण अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी सोडून द्या आणि घड्याळ हाती घ्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवा, असा आग्रह धरल्यामुळे पुण्यातली काका – पुतण्यांची युती फिस्कटली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या दादागिरीला जुमानले नाही.
गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!,
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू ठामपणे एकत्र एकत्र आल्यानंतर त्यांच्या पक्षांच्या वाट्यात खोडा घालायचा डाव पवार काका – पुतण्यांनी खेळलाय.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका ऐन मध्यावर आल्या असताना बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम; भाजपच्या सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!, हेच राजकीय वास्तव समोर आलेय.
मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच मोठा तोटा तर ठाकरे बंधूंच्या यशात खोडा!!, असे राजकीय चित्र एका निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू काही वेगळा निर्णय घेतात का??, असा सवाल देखील पुढे आला.
महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.
भाजप आणि दोन्ही पवारांनी चालविलेल्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका उद्भवला, इतकेच नाहीतर मतदारांना गृहीत धरल्याचा फटका सुद्धा बसू शकतो, याची शक्यता वाढल्याच्या खुणा आज दिसल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App