देशात धार्मिक स्वातंत्र्य आणि गुप्तहेर संस्था रॉवर बंदी घालण्याची मागणी करणारा अमेरिकन सरकारच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा (USCIRF) अहवाल भारत सरकारने फेटाळून लावला आहे.
तामिळनाडूत DMK स्टालिन अण्णांच्या सरकारची दुटप्पी भूमिका; हिंदीला लाथा, उर्दूला डोक्यावर घेऊन नाचा!!, असला प्रकार समोर आलाय.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी लवकरच एक मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बँका आणि UPI अॅप्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी १ एप्रिल २०२५ पासून लागू होतील.
सीबीआयच्या पथकाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर बुधवारी सकाळी छापा टाकला. असे सांगितले जात आहे की सीबीआयच्या पथकाने रायपूर आणि भिलाई येथील माजी मुख्यमंत्र्यांच्या घरांवर छापे टाकले. याआधी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही छापा टाकला होता
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना संपवण्याची मोहीम सुरूच आहे. मंगळवारी, दंतेवाडा येथे सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार मारले ज्यामध्ये सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली यांचा समावेश होता, ज्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अन्नामलाई आणि भाजपने युतीसाठी औपचारिक चर्चा सुरू केली आहे. एआयएडीएमकेचे एडाप्पाडी के पलानीस्वामी, ज्यांना ईपीएस म्हणून ओळखले जाते, त्यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमधील ही पहिलीच औपचारिक चर्चा होती.
भारत आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलणार आहे. २०२५-२६ पर्यंत १५६ स्वदेशी ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा करार स्वावलंबी भारताला चालना देण्यासाठी आणि भारतीय हवाई दल आणि लष्कराची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. याशिवाय, भारताचे स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने हे एक पाऊल देखील म्हणता येईल.
छत्तीसगडमधील दंतेवाडा-बिजापूर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ५० हून अधिक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. ३ मृतदेहांसह इन्सास रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, सुमारे ५०० जवानांनी कोर क्षेत्रात प्रवेश केला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून गोळीबार सुरू आहे.
देशातला बुलडोझर न्याय बंद व्हायला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने जरूर सांगितले, पण ज्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावले पाहिजे
राहुल गांधींसारखे “नमुने” भारतीय राजकारणात राहिले पाहिजेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग सोपा होतो
‘अल्पवयीन मुलीचे स्तन पकडून तिच्या पायजम्याची नाडी ओढणे हा बलात्कार नाही…’ या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली.
१ मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे.
वित्त विधेयक आज म्हणजेच २५ मार्च रोजी लोकसभेने ३५ सुधारणांसह मंजूर केले. यामध्ये ऑनलाइन जाहिरातींवरील ६% डिजिटल कर रद्द करणे यासारख्या सुधारणांचा समावेश आहे.
आरोपी प्रशांत कोरटकर यांने त्याच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला आहे. असे त्याने का केले? तसेच हा आरोपी एक महिना फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे गरजेचे असल्याचा दावा सरकारी वकील यांनी न्यायालयात केला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, संपूर्ण जगाने एक गोष्ट निःसंशयपणे स्वीकारली आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरण संरक्षणात संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहेत.
दिल्लीतील महिलांसाठी मंगळवारचा दिवस खूप खास होता. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत १ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
लोकसभेत वित्त विधेयक २०२५ मंजूर झाले आहे. आता ते राज्यसभेत मंजूर करण्याची तयारी सुरू आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन यांनी सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावरून अकांड तांडव करत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीचा फार्स केला.
केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भाजपवर कायमच विरोधकांचा मुस्लिम द्वेषाचा आरोप होत असताना भाजपने मात्र थेट मुस्लिम समाजाशी संपर्क वाढवायचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीमधील भाजप सरकारने मंगळवारी विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. भाजप सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठी वाढ केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या.
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. मंगळवारी भारताने म्हटले की पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. त्यांनी लवकरच हा परिसर रिकामा करायला हवा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरील चर्चेत पाकिस्तानने वारंवार जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला
कर्नाटकातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने सोमवारी सत्ताधारी काँग्रेसला इशारा दिला की जर त्यांच्या १८ आमदारांचे निलंबन मागे घेतले नाही
काँग्रेस प्रणित INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा परदेशी पैसा लोकसभा निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वापरला.
१९८७ बॅचचे आयएएस अजय सेठ हे अर्थ मंत्रालयाचे नवे वित्त सचिव असतील. अजय हे माजी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकृत विनोद खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामरा याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून माफी नाही मागणार अशी मस्ती केली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App