पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. विमान अपघातातील जखमींवर येथे उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी जखमींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी रुग्णालयाच्या सी७ वॉर्डला भेट दिली, जिथे जखमींवर उपचार सुरू आहेत.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एअर होस्टेसचा मृत्यू झाल्याने तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण करणे रोशनी सोनघरेसाठी जीवघेणे ठरले. महाराष्ट्रातील डोंबिवली येथील रहिवासी रोशनी लहानपणापासूनच एअर होस्टेस बनू इच्छित होती आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. तिचा प्रवास १०x१० च्या खोलीपासून सुरू झाला आणि तिचे ध्येय एअर इंडियाची केबिन क्रू बनणे होते.
जितेंद्र आव्हाड बनले “राहुल गांधी”; निवडणूक लढण्याच्या आधीच दिलीप पराभवाची कबुली!!, असला प्रकार खरंच झालाय. ज्याप्रमाणे राहुल गांधींनी बिहार विधानसभेची निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वीच पुढल्या पराभवाची कबुली देण्यासाठी कारणे शोधली
मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान परत बोलावले आहे. फ्लाइटराडार 24 नुसार, एअर इंडियाचे विमान AIC129 आज सकाळी मुंबईहून लंडनच्या दिशेने निघाले होते. परंतु उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान मुंबईला परत बोलावले गेले आहे. असे सांगण्यात येत आहे की इराण व इस्रायलमधील संघर्ष लक्षात घेता, एअर इंडियाने हे विमान परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अनेक विमानांचा मार्गही वळवण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला केवळ भारत-पाकिस्तान सीमा वाद म्हणून न पाहता, दहशतवादाविरुद्ध भारताची कारवाई म्हणून पाहण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना केले आहे.
इजरायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने आपली हवाई हद्द बंद केली. त्याचा परिणाम भारतीय विमानसेवेवर झाला असून अमेरिका आणि युरोप ला जाणारी आणि तिकडून येणारी सर्व विमाने एअर इंडियाने ती इतरत्र वळवली आहेत
इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी याच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी सोनम आणि इतर चार आरोपींना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाचही जण कोर्टरूममध्ये असताना कुणीही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघितले नाही. सध्या तरी, पाचही जण शिलाँगच्या सदर पोलिस ठाण्यात रात्र घालवतील पोलिस सूत्रांनी सांगितले
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड २१ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी होऊ शकते. पुढील आठवड्यापासून या दिशेने हालचाली तीव्र होतील. सुमारे १० राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतर लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले की – भारताच्या राजनैतिकतेला बुधवारी एकाच दिवसात अमेरिकेकडून तीन मोठे धक्के बसले आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि भारत-अमेरिका संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तेलंगणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नूने श्रीधर यांच्या १३ ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली. एसीबीने बुधवारी या प्रकरणाची माहिती दिली.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. प्रवाशांच्या यादीत ते १२ व्या क्रमांकाचे प्रवासी होते. रुपाणी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांची मुलगी विवाहित आहे आणि ती तिच्या कुटुंबासह लंडनमध्ये राहते.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात ५२ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. या अपघातातून एक ब्रिटिश प्रवासी बचावला.
मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष कसे बनले आणि काँग्रेस पक्ष कोण चालवत आहे हे कोणापासूनही लपलेले नाही. असंही म्हणाले आहेत.
गुजरातमधील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी पीडितांच्या डीएनएची तपासणी करेल.
अहमदाबाद मधल्या विमान अपघाताबद्दल टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.
अहमदाबाद विमान एवढा गंभीर आहे की त्यामुळे संपूर्ण देशच नाही तर जग सुन्न झाले आहे. B – 787 ड्रीम लाइनर सारखे अत्याधुनिक आणि सुरक्षित विमान एवढ्या सहजपणे अपघातग्रस्त कसे होऊ शकते
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे विशेषतः तरुणांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत आहे. कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार आहे, ज्यावर उपचार करणे कधीकधी कठीण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, पुढील 2 दशकांत कर्करोगाचे रुग्ण 60 टक्के वाढण्याची शक्यता आहे. असेही म्हटले आहे की 10 पैकी 1 कर्करोगाचा रुग्ण भारतीय आहे. आजच्या काळात केवळ तरुणच नाही तर मुले देखील या आजाराला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, या गंभीर आजारापासून दूर राहणे खूप महत्वाचे आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, भारतीय शिष्टमंडळ जगातील अनेक देशांना भेट देऊन आणि भारताची बाजू मांडल्यानंतर परतले आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिनिधींना भेटून त्यांचे अनुभव जाणून घेतले.
गुजरातमधील अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात झाला, ज्यामध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि त्यात एकूण २४२ प्रवासी होते. टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि ते एका निवासी भागात कोसळले. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि आगीच्या भयंकर ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. अपघात झालेले विमान ७८७-८ ड्रीमलाइनर विमान आहे.
अहमदाबाद विमान अपघाताबद्दल सोशल मीडिया वरून शंका आणि सवाल यांचे काहूर उठले असताना काही तज्ञ मंडळींनी काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस बजावली आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्यांनी उत्तर मागितले आहे.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्थ मंत्रालयाने बुधवारी (११ जून) X वर पोस्ट केले आणि UPI व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार असल्याचे म्हटले.
अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.
गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटने टेकऑफ घेतल्यानंतर हा अपघात झाला.
नवी दिल्ली व भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील वाद नाही, तर तो जागतिक दहशतवादाविरुद्धचा निर्णायक लढा आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस हा दहशतवाद तुमच्या घरापर्यंत येईल असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आ
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App