पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशवासीयांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. देशात सर्व आवश्यक अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा मुबलक साठा आहे,
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. आता भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईवर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विशेषतः संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेसह अनेक देशांतील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या कोणत्याही प्रक्षोभक प्रयत्नांना ठामपणे तोंड देण्याच्या भारताच्या दृढनिश्चयावर भर दिला.
भारताने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला तोंड देताना पाकिस्तानचे प्रत्यक्ष नाकी नऊ आलेत. कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाली.
जम्मू आणि काश्मीरसह भारतातील काही राज्यांवर पाकिस्तानने हल्ला केला. हे हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान आणि दोन जेएफ १७ विमान पाडले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ड्रोन हल्लेही हाणून पाडले.
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. बुधवारप्रमाणे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग होत्या.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमान पाडले आहे. तसेच, पाकिस्तान हवाई दलाचे AWACS विमान त्यांच्याच पंजाब प्रांतात पाडले गेले. हे विमान पाकिस्तानच्या सीमेत पडल्याचे सांगण्यात येत आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारचे कौतुक केले आहे. ऑपरेशन सिंदूरवरील भारत सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वर्णन थरूर यांनी पाकिस्तान आणि जगाला एक मजबूत संदेश असल्याचे सांगितले.
मुंबईहून संचालित भारतीय नौदलाचा पश्चिमेकडील ताफा पूर्णपणे तैनात आणि सज्ज आहे. जर या भागात कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर ते प्रत्युत्तर देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा चालू हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ही मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत बैठक घेतली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सर्व सीमावर्ती राज्यांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हवाई हल्ले सुरू केले आहेत.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले चढविले. भारतातल्या लष्करी आणि नागरी ठिकाणांना टार्गेट केले.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करून त्याच्या निवृत्तीची माहिती दिली. टी-२० मधून आधीच निवृत्त झालेला रोहित एकदिवसीय सामने खेळत राहील. बुधवारी संध्याकाळी असे वृत्त आले होते की इंग्लंड दौऱ्यावर त्याला कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकले जाईल. त्यानंतर त्याने लाल चेंडू क्रिकेटला निरोप दिला.
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी या हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिलला निघाले होते. या अपघातामागील कारण सध्या तपासले जात आहे.
१९८४च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित ६ प्रकरणांमध्ये निर्दोष सुटलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या अपीलावर सुनावणी करताना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींकडून २१ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. हे एक मोठे अपडेट आहे. भारत सरकारचा हेतू स्पष्ट आहे की जर पाकिस्तानने काहीही करण्याचे धाडस केले तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील आठ जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्था बुधवारी बंद ठेवण्यात आल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या सीमा, सैन्य आणि नागरिकांवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना भारताचे योग्य उत्तर असल्याचे वर्णन केले आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानातल्या दहशतवादी केंद्रांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दलाने भारतामध्ये विविध ठिकाणी हल्ले केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव, भारताने सुरू केलेले operation Sindoor या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आवश्यक ती माहिती दिली.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता पाकिस्तानच्या लाहोर शहरातून एकामागून एक तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरात स्फोट झाले आहेत.
भारतातल्या अमृतसर एअर बेसवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानने करून काही व्हिडिओ व्हायरल केले. प्रत्यक्षात पाकिस्तानी हॅन्डलर्सनी वेगळ्याच ठिकाणच्या आगीचे व्हिडिओ व्हायरल केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.
भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या “ऑपरेशन सिंदूर’ मधल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले
पंतप्रधान मोदी म्हणाले – २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचेल. येत्या आठवड्यात एक भारतीय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहे. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चंद्राव्यतिरिक्त, मंगळ आणि शुक्र देखील आपल्या रडारवर आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App