नवीन महिना म्हणजेच मे मध्ये अनेक बदल झाले आहेत. आजपासून अमूलचे दूध २ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर एटीएम फ्री लिमिटनंतर पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागेल. याशिवाय, आता तुम्हाला वेटिंग तिकिटावर स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही.
दिल्लीच्या एका न्यायालयाने एनआयएला २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या आवाजाचे आणि हस्तलेखनाचे नमुने गोळा करण्याची परवानगी दिली आहे. २८ एप्रिल रोजी विशेष राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) न्यायाधीश चंदरजीत सिंग यांनी राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ केली, असे एका सूत्राने सांगितले. एजन्सीने दाखल केलेल्या अर्जावर त्यांनी ३० एप्रिल रोजी हा आदेश दिला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले होते. तसेच, पाकिस्तानी नागरिकांना २९ ते ३० एप्रिल दरम्यान भारत सोडून पाकिस्तानात जाण्यास सांगण्यात आले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि पर्यटकांच्या क्रूर हत्येमुळे भारतात संताप आहे. संपूर्ण देश दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर कारवाईची मागणी करत आहे. तथापि, काँग्रेस नेते रॉबर्ट वड्रा यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे रोजी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. ते मराठीत म्हणाले, “आज महाराष्ट्र स्थापना दिन आहे. माझ्या सर्व मराठी बंधू आणि भगिनींना शुभेच्छा.” यानंतर त्यांनी सर्व गुजराती समुदायाचे गुजराती भाषेत अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. मोदी मंत्रिमंडळाने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात ९४ वर्षांनंतर जातीय जनगणना होणार आहे. २०११ च्या जनगणनेत जातींची गणना करण्यात आली होती परंतु त्याची माहिती कधीही उघड करण्यात आली नाही.
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा विजय झाला, असे ढोल काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पिटले असले, तरी प्रत्यक्षात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा राजकीय आणि सामाजिक बारकावा लक्षात घेतला, तर मोदींचे “कमंडल” राजकारण यशस्वी आणि त्यानंतर “मंडल” राजकारणात एंट्री याच शब्दांमध्ये संबंधित निर्णयाचे वर्णन करावे लागेल.
पंजाब काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आता युट्यूबर बनले आहेत. बुधवारी अमृतसरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की या चॅनेलवर ते राजकारणाबद्दल नाही, तर जीवनाबद्दल बोलतील.
२८ एप्रिल रोजी काँग्रेसने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता असल्याची पोस्ट शेअर केली होती, जी नंतर हटवण्यात आली. दिवसभर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची (NSAB) पुनर्रचना केली आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख आलोक जोशी यांना त्याचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
कुख्यात गुंड लॉरेन्सने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्स ग्रुपने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या फोटोवर क्रॉस लावण्यात आला आहे. यामध्ये लॉरेन्स गँगने लिहिले आहे – “तुम्ही आमच्या निष्पाप लोकांना मारले आहे, आता आम्ही पाकिस्तानात घुसून एका माणसाला मारू ज्याची किंमत एक लाख असेल.”
बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याचा अर्थ असा की पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांना २३ मे पर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येणार नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई करत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तपासादरम्यान असे पुरावे मिळाले आहेत, की या हल्ल्यात पाक-पुरस्कृत दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) किंवा आतल्या व्यक्तीने मदत केली होती.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध २ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांची पत्रकार परिषद. नवज्योत सिंग सिद्धू यांनी बुधवारी एक खास पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेद्वारे सिद्धू यांनी त्यांच्या नवीन इनिंगची घोषणाही केली.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ही माहिती दिली आहे.
नवी दिल्लीत झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये तणाव वाढला असताना संपूर्ण देशाचेच नाही, तर जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या संभाव्य युद्धाकडे लागले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने एक मोठे आणि धोरणात्मक पाऊल उचलले आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची (NSAB) पुनर्रचना केली आहे, ज्यामध्ये रिसर्च अँण्ड अँनालिसिस विंगचे (RAW) माजी प्रमुख आलोक जोशी यांची मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी देशभरामध्ये गदारोळ केला होता
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अमेरिकन न्याय विभागाच्या चौकशीत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
मंगळवारी पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान शिक्षण विभागाची वेबसाइट हॅक केली. वेबसाइटच्या होम पेजवर ‘पाकिस्तान सायबर फोर्स’. ‘पुढचा हल्ला गोळ्यांनी नाही तर तंत्रज्ञानाने होईल’, असे लिहिले होते. शिक्षण विभागाकडून वेबसाइट पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यात मोठे बदल झाले आहेत. एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय हवाई दलाचे (IAF) नवे उपप्रमुख असतील. ते १ मे रोजी एअर मार्शल सुजीत पुष्पकर धारकर यांची जागा घेतील. ४० वर्षांहून अधिक काळ सेवेनंतर धारकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम या वर्षी 5 जूनपर्यंत पूर्ण होईल. बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंगळवारी दुपारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंदिराच्या वरच्या बाजूला 42 फूट उंच धार्मिक ध्वजस्तंभ देखील स्थापित करण्यात आला आहे. आता ध्वज सर्वात वरच्या भागात ठेवला जाईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App