उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपण्यासाठी जनतेला घरात अन् महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोलण्याचे आवाहन केले. हिंदी भारतात अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. पण मराठी आपली मातृभाषा आहे. ती आपल्याला उत्कृष्टपणे बोलता आली पाहिजे, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालायची शक्यताय. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताजा अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
एकीकडे अजितदादा म्हणाले, काम करू दर्जेदार; तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी नागपूर कार्यालयात उडविला लावणीचा बार!!, असला प्रकार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून समोर आला.
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले असून, यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मोहोळ यांनी नुकतीच जैनमुनींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, ‘माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही आणि मी हे पुराव्यानिशी वारंवार स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, हा प्रश्न काही दिवसांत संपेल,’ असे आश्वासन दिले होते. मात्र, मोहोळ यांच्या या विधानानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबई आणि पुण्यातल्या गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये बातम्या पाहिल्या तर सत्तेवर नेमके कोण आहे??, असा सवाल मनात आल्यापासून राहत नाही. कारण या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या भडीमारा मधून 2014 पूर्वीच्या राजकीय दिवसांची आठवण ढवळून वर आली.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे निंबाळकरांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण, सातारा येथे कृतज्ञता मेळाव्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण आणि माणदेश भागातील सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असेही मुंडे म्हणाल्या. परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुण्यातील जैन बोर्डिंग भूखंडाच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणावरून धंगेकर चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते असून, त्यांना “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही,” असा सल्ला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला. सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. आता वय पुढे करून पळ काढू नका, असे रोहित पवार म्हणालेत.
बॉलीवूडची खानावळ नाही राहिली “उपयोगी”; म्हणून पाकिस्तानने वाढवली “दहशतवाद्यांची” यादी!!,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आज एकाच दिवशी सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी केली.
राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजप मध्ये आले असले आणि अजित पवार त्याच भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले असले तरी पवार आपले चव्हाण घराण्याशी असलेले राजकीय वैर विसलेले नाहीत.
जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातील महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला. मंत्रालयातील महसूल विभागाच्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र वापरून हा आदेश काढण्यात आला होता. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार समोर आला असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने मागील चार दिवसांपासून शिर्डीत देशभरातून आलेल्या साईभक्तांची मोठी गर्दी झाली. साईनगरीच्या संपूर्ण परिसरातील वाहनतळ, पार्किंग, भक्तनिवास आणि साईमंदिर दर्शनरांग सर्वत्र हाऊसफुल्ल आहे.
पुण्यामध्ये महायुती मधले संबंध पुरते खारट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना निरोप पाठविला, महायुती मिठाचा खडा पडता कामा नये!! पण तोपर्यंत धंगेकरांना महायुतीत काय करायचे होते, ते करून झाले होते.
दीपावलीच्या मंगल संध्याकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित भव्य ‘गोदावरी महाआरती’ सध्या अत्यंत भक्तिभावाने पार पडत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन, मुंबई येथे ‘प्राकृतिक कृषी संमेलन 2025’ झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती शाश्वत शेतीकडे नेणारी एक सर्वसमावेशक दृष्टी आहे. रासायनिक खतांसह बियाणांचा अतिवापर जमिनीची सुपीकता कमी करत आहे, त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांवर संकट येत आहे. अशा स्थितीत नैसर्गिक शेती ही निसर्गाशी सुसंगत आणि नफा वाढवणारी दिशा ठरते. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकाचा उपयोग करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास साधता येतो.
राज्यात वाढत असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आणि शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, राज्य शासनाने नवीन शिधापत्रिकेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आणि आमदार झालेल्या समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना एकत्र आणायचा घाट घातलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड कंपनीला संरक्षण आणि एअरोस्पेस उपकरणांच्या निर्मितीसाठी मिहान एसईझेड, नागपूर येथील सुमारे 223 एकर भूखंडाचे वाटपपत्र अटींच्या अधीन राहून प्रदान केले.
सतत नकारात्मक बातम्या येणाऱ्या बीडमधून सकारात्मक बातमी आली. ‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यानं राज्यात विक्रमी कामगिरी केली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App