आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे केले आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होईल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर श्री गणरायाने आगमना आधीच कृपा केलीय. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना फडणवीस सरकारने खुशखबर दिली.
सत्तेच्या कामासाठी संघ स्पृश्य, पण सामाजिक कामासाठी अस्पृश्य; यशवंत + पवार संस्कारांचा पुरोगामी ढोंगी स्पर्श!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवारांच्या एका ट्विट मुळे आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रोहित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी संस्कारांची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांनी त्यात अजित पवारांना टोले हाणले. जणू काही अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे “फार मोठे पाप” घडले, असा आव रोहित पवारांनी त्या ट्विट मधून आणला. त्या ट्विटला यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या “पुरोगामी संस्कारांची फोडणी” दिली.
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचा दाणून पराभव झालेला आहे. ठाकरे बंधूंची उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाहीये. मात्र ठाकरे बंधूंच्या नेत्यांना हा पराभव पचवता आलेला नाहीये.
बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकी करून देखील ते हरले. त्यानंतर भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी विजय उत्सव साजरा केला तर ठाकरे बंधूंनी ती निवडणूक किरकोळ आणि छोटी असल्याची मखलाशी केली. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी शशांक राव यांना आतून मदत केली होती त्यामुळे शशांक राव यांचे चर्चेत नसलेले पॅनल जिंकून आले, असे विश्लेषण मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले.
आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भेटीचे कारण नक्की काय? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र आता स्वतः राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलेलबी ३’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. मात्र रिलीज पूर्वीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे.
ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट साेसायटीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने प्रस्तावित शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना, विविध विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीचे राजकीयकरण केले, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम असताना, सरकारने पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपावर पालकमंत्र्यांची संपूर्ण पकड होती. कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणत्या आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांच्या हातात होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या या मनमानीवर आता सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, निधी वाटपाच्या नवीन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.
महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेते शरद पवारांना लक्ष्य करतात. त्यात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवारांवर टीका करताना दिसून येतात. परंतु, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दाेन्ही ठाकरे बंधूंना माेठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित तिघांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असे ते म्हणालेत. दरम्यान, मी गांधी नाही, पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी कीर्तनकारक संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे पुण्यातील बऱ्याच भागात पाणी साचलेले आहे. परंतु याचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरील एकता नगर भागाला बसला आहे.
0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!, असे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या पराभवाने आणि त्या पाठोपाठ भाजपच्या आयातवीर नेत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे आली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना ते बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन झाले, असे जाहीर करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही!
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारी ते यवतमाळमधील पुसद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप करत संपूर्ण विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. मात्र, विरोधी पक्षाला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ही तक्रार महाराष्ट्र उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी योग्य मानली नाही. जूनमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, जे सोमवारी फेटाळण्यात आले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.
मागील कित्येक दिवसांपासून रखडलेला पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुल अखेर आता नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. मात्र सिंहगड उड्डाणपुलाबाबत पालिकेकडून अजूनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App