भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्याद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांनी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्यासह पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची आणि नवीन ‘रिफ्रेश कोर्सेस’ सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
महाराष्ट्रातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा
नाशिक : Waqf सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे उरलेले लळिताचे राजकीय कीर्तन अजून सुरू असून संसदेतल्या वादसंवाद असे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात उमटत आहेत. […]
तलाठ्यापासून मंत्रालयातून राज्याचा कारभार चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण ‘एक परिवार’ आहोत हे ध्यानात ठेवून न घाबरता जनतेची कामे करावी. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक जाणीवपूर्वक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या, असा कानमंत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना संजय निरुपम म्हणाले की, ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ च्या विरोधात मतदान करण्यास भाग पाडले. निरुपम म्हणाले की, ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांना पाच वेळा फोन करून या विधेयकाविरुद्ध मतदान करण्याचे निर्देश दिले.
तीन दिवसांपूर्वी एका सभेत मनोज दादांना चक्कर आली होती. म्हणून तब्येतीची विचारपूस करावी, आतापर्यंत भेटलो नव्हतो. फक्त फोनवर चर्चा झाली. पुढे त्यांना काही आमची मदत हवी असेल, ताकद येण्यासाठी म्हणा, मी नक्कीच त्यांच्यासाठी उभी असणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणाबाबत पुढे काय दिशा ठरवायची, यावर चर्चा झाली असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले.
देशाच्या राजकीय वातावरणाचे भवितव्य ठरवणाऱ्या waqf सुधारणा विधेयकावरील चर्चेच्या वेळी (शप) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्यसभेत गैरहजर राहिले.
हिंदुत्वाच्या नावाने उद्धव सेनेने दिल्लीत भलतेच चाळे केले. मुंबईत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या चाळ्यांना पाठिंबा दिला, पण अजित पवारांचे खासदार मात्र मुकाटपणे waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मोकळे झाले.
waqf सुधारणा विधेयक काल मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर अनेकांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात.
केंद्रातले मोदी सरकार एकीकडे waqf सुधारणा कायदा मांडत असताना महाराष्ट्रातल्या राजकारणात “चुलत्याची कृपा” हा विषय अचानक चर्चेचा झाला. त्यावर अनेकांनी क्रिया – प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराभोवतीचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुंबई पोलिसांना या प्रकरणात कामराची चौकशी करायची आहे परंतु दोनदा समन्स मिळाल्यानंतरही कामरा हजर झालेला नाही. यानंतर, पोलिसांनी आता त्याला तिसरे समन्स बजावले आहे. त्याला ५ एप्रिल रोजी खार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 25 वर्षे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीत गुंड, वाळू माफिया, राख माफिया यांची भरती केली, पण आता बीडमध्ये जाऊन अजितदादांना त्यांचीच झाडाझडती घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा “इफेक्ट” बीडमध्ये आज दिसला.
बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेले वक्फ दुरुस्ती विधेयक 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केले जाणार आहे. मात्र, मुस्लीम समाजाकडून या विधेयकाला विरोध दर्शवण्यात येत आहे.
मी कुठेही नाराज नाही, माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकले नाहीत, म्हणत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बीएसएनएल/एमएनटीएल लँड मॉनेटायझेशन, भारत नेटची स्थि
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे भरभक्कम पाठिंबाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेने निवडणुका लवकरात लवकर होतील अशा अटकळी सगळ्या पक्षांनी बांधले होत्या
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड Walmik karad आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मध्ये संघ स्थानावर येऊन गेल्यानंतर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूर मध्ये येऊन संघस्थळी डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट दिली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या औरंगजेब विषयक वादावर काल गुढीपाडवा मेळाव्यात संताप व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. गोपाळगंजमधील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘बिहारला ठरवावे लागेल की लालू-राबडी यांच्या जंगलराजकडे जायचे की मोदी-नीतीशच्या विकासाच्या मार्गाकडे.’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी देशातील नदी प्रदूषण, यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम तणाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद यावर भाष्य केले. यासोबतच राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App