विशेष प्रतिनिधी पुणे : Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेने राज्य सरकारच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील महापालिकांमध्ये पहिला क्रमांक मिळवला असला, तरी आठ कोटी रुपये […]
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पण त्यापैकी एकाही वेळा मराठा आरक्षणाचे समर्थन न केलेल्या त्याचबरोबर मराठा आरक्षण न दिलेल्या शरद पवारांनी आज अचानक घुमजाव करून मराठा आरक्षणाची बाजू घेतली.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईच्या वेशीवर ठाण मांडले आहे. राज्याच्या […]
कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई ही देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे आहेत. तर पटना, जयपूर, फरीदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही महिलांसाठी सर्वात कमी सुरक्षित शहरांमध्ये आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनावर काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणे लावण्याचा त्यांचा डाव आहे. मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान त्यांनी रचलेय.
विशेष प्रतिनिधी पुणे : MP Sports Festival : भारतातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांचा एक भाग म्हणून पुण्यात नोव्हेंबर […]
यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना हाके म्हणाले, मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच मनाेज जरांगेंच्या मागणीला अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील शासनाने त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली पाहिजे, नाही तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!! बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या नेत्यांनी त्या आंदोलनात घुसखोरी केली आहे. पण त्याचवेळी पवार आणि ठाकरे यांची ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका मात्र संशयाच्या घेऱ्यात आली आहे
उच्च न्यायालयाने मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना पाेलीसांच्या परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदाेलन करण्यास परवानगी नाकारली हाेती.
आझाद मैदानापासून ते पार मुंबईच्या वेशीपर्यंत मराठा मोर्चा मुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून त्यामुळे गणेश भक्तांची मोठी पंचाईत झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते. तसेच दोन्ही नेत्यांच्या कुटुंबीयांनी स्नेहभोजन देखील केले होते. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला असल्याचे समजते. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे फायदे उपटायला पाहात आहेत, त्यांचा फायदा होणार नाही. मोठे नुकसानच होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीगणेशाने दोन्ही भावांना सुबुद्धी दिली आहे. त्यांनी कायम एकत्र राहावे, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारत ट्रम्प यांच्या टॅरिफला नक्कीच तोंड देईल आणि या आव्हानाला संधीमध्ये बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!, असेच चित्र ठाकरे बंधूंच्या आजच्या तिसऱ्या भेटीवरून दिसून आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनाला गेले. त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे अर्थातच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही होते. दोन्ही बंधूंनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांनी बसविलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. पण प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांच्या चित्रासमोर फोटोला पोज देताना दोन्ही बंधूंनी आपापली हातांची घडी घातलेली दिसली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते.
मराठा आरक्षणाचे आंदोलन करताना मनोज जरांगे श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात काही बोलत नाहीत. तेच मराठा आरक्षणातले खरे अडथळा आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App