महाविकास आघाडीचे नेते गेले निवडणूक आयोगाकडे पण महायुतीचे नेते पोहोचले पक्षांच्या बैठकांमध्ये आणि नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये!!, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन समांतर घडामोडी घडल्या.
महाराष्ट्र बांबू उद्योग धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंजुरी दिली. फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक निर्णय घेतले. (उद्योग विभाग)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या फेब्रु-मार्च 2026 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आणि अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे, या हेतूने मंडळाने यंदाही परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जातील.
आपल्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी व सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचारी संघटना आणि कृती समितीसोबत आज सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या शिक्षणावरून टीका केली होती. रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, अजित पवार दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नसल्याची टीका दमानिया यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अजित पवारांची बाजू मांडली. वडिलांच्या निधनामुळे अजित दादांना शिक्षण सोडावे लागले होते. यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून अतिशय संवेदनशील घटना असल्याचे चाकणकर यांनी म्हटले होते. यावरून आता अंजली दमानिया यांनी पुन्हा ट्विट करत यावर प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. तसेच यावेळी धर्मनिरपेक्षता जपण्याचे आवाहनही शरद पवारांनी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघावर बंदी घालण्यासंबंधी काँग्रेसने केलेली मागणी धुडकावून लावली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप – जदयू महायुती आणि विरोधी काँग्रेस – राजद महागठबंधन यांच्यात पारंपरिक लढत असली, तरी त्यामध्ये पहिल्यांदाच एका निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा होत आहे. या निवडणूक रणनीतीकाराने या परीक्षेतला पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडवून पहिल्या यादीत 116 उमेदवार जाहीर करून टाकलेत. या यादीत त्यांनी सामाजिक संतुलन राखायचा प्रयत्न केलाय. 116 पैकी 91 उमेदवार जनरल कॅटेगिरीचे, 25 उमेदवार आरक्षित, 31 उमेदवार ईबीसी, 21 उमेदवार ओबीसी, तर 21 उमेदवार मुस्लिम, अशा पद्धतीने प्रशांत किशोर यांनी पहिल्या यादीतील राजकीय + सामाजिक मांडणी केली आहे.
भाजपच्या सत्तेची वळचण हवी; पण नको भगवी टोपी; पवार काका – पुतण्याची भूमिका नेहमीच दुटप्पी!!, असला प्रकार आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर आला.
मूळात मनसेने काँग्रेसला प्रस्तावच पाठवलेला नाही त्यामुळे कसली महाविकास आघाडी आणि कसलं काय??, हीच राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली.
आमदार संग्राम जगताप यांनी केलेले वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरून नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी नोटीस देखील काढली असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागलात तर कोणताही पक्ष सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भूमिहीनांना जमीन देण्यासाठी राज्यात आणि देशात विनोबा भावे यांनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात २० कोटी एकर जमीन रिक्त असून, ती भूमिहीनांना देण्यात यावी, असे आठवले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे गायरान हक्क परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीत चौथा भिडू नको असे म्हणून काँग्रेसने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झिडकारले
वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. पैशांचे सोंग जमात नसेल तर खुर्ची सोडा, असे म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बच्चू कडू यांनी अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीचे उदघाटन आणि कोनशिला अनावरण संपन्न झाले.
एकीकडे अजितदादांची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगताप यांना आवरता येई ना म्हणून झाली गोची!!, अशी अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय.महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आली. ती प्रफुल्ल पटेल आणि अनिल भाईदास जगताप यांच्या तोंडून बाहेरही पडली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एवढी तोकडी की त्यांना पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिका यापलीकडे फारसे स्थानही नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशातील अनेक लोकांना हिंदुत्वाचा अभिमान होता आणि त्यांनी हिंदू एकतेबद्दल बोलले, परंतु आरएसएससारखी संघटना फक्त नागपुरातच निर्माण होऊ शकली. त्याग आणि समाजसेवेची भावना येथे आधीच अस्तित्वात होती.”
भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड सीझन 1’चे उदघाटन संपन्न झाले. आजचा काळ हा एआयचा आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. संभाजीनगरमधील मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन विभागांचा दौरा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दीर्घ बैठका घेतल्या.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सरकारच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला. वडगाव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जमिनीच्या व्यवहारांसाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या आणि भूमी अभिलेख विभागाच्या ‘धीम्या’ गतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ‘क्रांतिकारी’ बातमी आहे! महसूल विभागाने ‘जनहित’ साधणारा ऐतिहासिक निर्णय घेत, जमिनीच्या मोजणीचा निपटारा करण्यासाठी लागणारा १२० दिवसांचा दीर्घ कालावधी थेट केवळ ३० दिवसांवर आणला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App