नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोनला काही किंमत नसते. जे काही आहे ते सर्व देवाभाऊच आहे. सगळ्या बहिणींचाही भाऊ आणि इतरांचाही भाऊ, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाला पुन्हा डिवचले आहे.
राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान 2 डिसेंबरला होईल. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याचे भाकीत अनेकांनी वर्तविले. दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका अशा टप्प्याच्या वळणावर आल्या आहेत, की जिथून 2 डिसेंबर या तारखे नंतर राज्यात “राजकीय भूकंप” होण्याचे पतंग उडू लागले आहेत. ज्या “पवार बुद्धीच्या” माध्यमांना महाराष्ट्रातले फडणवीस सरकार अमान्य आहे, त्यांनीच या पतंगांना मोठी हवा देऊन ते उंच उंच हवेत उडवले आहेत.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसद भवनात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारने संसदेत वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारी अधिसूचना जारी केली आहे. ही काय गोष्ट आहे? यामागे कुणाचे डोके आहे? माझे खासदार संसदेत जाऊन वंदे मातरम म्हणतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना बाहेर काढून दाखवावे, असे ते म्हणाले. भाजपचे हिंदुत्त्व ढोंगी आहे. भाजपचे मुंह में राम बगल में अदानी, असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. अदानी हा शब्द कॉन्ट्रॅक्टरचा प्रतीक झालाय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कुंभमेळ्याचे कारण सांगून नाशिकमध्ये वृक्षतोडीचा घाट घातला जातोय. ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातेय, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबईत ठाकरे बंधूंची नववी का दहावी भेट झाली दोघांमध्ये शिवतीर्थयावर काही चर्चा झाली त्यावर मराठी माध्यमांनी भरपूर पतंग उडवले पण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सगळ्या पतंगांची कन्नी कापली.
या मातीतील प्रस्थापितांना करून टाकू ढेर, पुन्हा एकदा भगवा फडकावू जिंकू संगमनेर…!!, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मध्ये एल्गार केला.
आजीला बांधून दिले हक्काचे घर; खासदार श्रीकांत शिंदेंना मिळाले भरभरून आशीर्वाद!!, ही घटना हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत घडली. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः हा अनुभव सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. हे प्रकरण भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेशी संबंधित आहे. आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजसंदर्भात हे प्रकरण दाखल करण्यात आले होते.
राज्यात बेकायदेशीरपद्धतीने व खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
नवी मुंबईतील सिडकोच्या ४५०० कोटींच्या जमीन घोटाळाप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या चाैकशीची घोषणा दोन महिन्यांपूर्वी झाली होती
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे आधीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. यापूर्वीही आम्ही सांगितले होते की शेतकऱ्यांच्या गळ्याशी येत असेल तर सरकार काही निर्णय घेईल म्हणून आम्ही शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. ज्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या घरी जात तगादा लावणार नाही, असे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
लोहा नगरपरिषद निवडणुकीत शरद पवार नावाचा फायदा की तोटा??; कुणाला बसणार फटका??, असे विचारायची वेळ तिथल्या राजकीय घडामोडींनी आणली.
महाराष्ट्रातली नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक शिगेला पोहोचली पण तरीसुद्धा शरद पवारांनी अजून विरोधकांना “हा” सवाल का नाही विचारला
बुडत्याला दिसली आधाराची काडी; पवारांच्या नेत्याने पाहिली भविष्याची नांदी!!, असेच म्हणायची वेळ पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाषणामुळे आली.
एरवी स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या शरद पवारांना ध्यानधारणेची पुस्तके भेट मिळाली आणि त्याबरोबर perfect political timing साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. देव देव करण्यापासून दूर राहिलेल्या शरद पवारांना ध्यान धारणेची पुस्तके भेट दिली आणि ती त्यांनी स्वीकारली याचे बरेच राजकीय अर्थ मुंबईच्या राजकीय वर्तुळात काढले गेले. शरद पवारांनी आत्तापर्यंत “राजयोग” साधायचे बरेच प्रयत्न केले, पण ते सगळे भौतिक पातळीवरचे होते. आता ध्यानधारणेने द्वारे तरी त्यांना या वयात “राजयोग” साध्य होईल का??, असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येतोय.
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्री पदाचा 24 तासांत त्यांचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा ताबडतोब घ्यावा.
राज्याच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मालेगाव मधले नेते दादा भुसे यांना राष्ट्रवादीच्या संस्कारांचे लागण झाल्याची चिन्हे दिसली. एकनाथ शिंदेंच्या पेक्षा दादा भुसे यांनाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची तहान लागली.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीने बरेच झोल केले. याची सगळी यादी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली.
बनावट आयएएस कल्पना भागवतचे अफगाणिस्तान-पाकिस्तान कनेक्शनचे धागेदोरे समोर येत आहेत. अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी कल्पनाने ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली.
२५२ कोटी रुपयांच्या ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम उर्फ मोहम्मद सुहैल शेख याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे, अभिनेता-दिग्दर्शक सिद्धांत कपूर यांची मंगळवारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षासमोर (एएनसी) ५ तास चौकशी केली गेली. सिद्धांत हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा पुत्र आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे.
बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. नुकत्याच २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे चक्क १०३ वेळा नोंदवली गेल्याचेही यादीतून दिसून येते.
गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती पेशाने डॉक्टर होती. इतरांचे प्राण वाचवणारी होती. स्वतःचं आयुष्य संपवेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने आत्महत्या केली नाही तर ही तिची हत्याच आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.
जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
छत्रपती संभाजीनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्य करणारी कल्पना भागवत (वय 45) नावाची महिला अचानक पोलिस, एटीएस (Anti-Terror Squad) आणि आयबी (Intelligence Bureau) यांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App