दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) “तब्बल” 10 आमदारांच्या बळावर शरद पवारांनी म्हणे “मोठ्ठा डाव” टाकलाय. पण काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांना तो डाव पटतचं नाय!!, अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील एका आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात सुमारे ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात इतर कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे लोक भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल. हे फक्त शिवसेनेच्या शिंदे गटातूनच होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत अमित शाहांवर कोल्हापुरातले “संस्कार” नाहीत असे शरसंधान साधले, त्यानंतर अमित शहा यांनी मालेगावातून पवारांचे पॉलिटिकल मार्केटिंग एक्स्पोज केले!! दोन दिग्गज नेत्यांमधील ही जुगलबंदी आज रंगली.
राज्यात धनंजय मुंडे कृषि मंत्री असताना पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. यावर गैरव्यवहार म्हणजे भ्रष्टाचार नाही असा अजब तर्क कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराड याच्यामुळे आणखी एक पोलीस अधिकारी अडचणीत आला आहे. या दोघांतील फोन संवाद व्हायरल झाला आहे.
लोकसभे पाठोपाठ आपण विधानसभेत देखील शिवसेनेने ऐतिहासीक विजय मिळवला कारण बाळासाहेबांच्या धगधगत्या प्रेरणेने आणि विचाराने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला म्हणून दणदणीत विजय आपल्याला मिळला आणि तो विजयउत्सव आज आपण साजरा करतोय, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या जबरदस्त फटका खाल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून स्वबळाची भाषा सुरू केली, तर शरद पवारांना ती नाईलाजास्तव सुरू करावी लागली. त्यामागे आपापल्या उरल्या सुरल्या जहागिऱ्या वाचवायची खरी स्ट्रॅटेजी असल्याचे उघड दिसले.
२०२३ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये २५९० लोकांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये, हा आकडा थोडा कमी झाला. पण तरीही एकूण २४६८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.Mumbai Suburban
महाविकास आघाडीतून महायुतीकडे कोण कोण जातोय त्याची मी वाट बघतोय अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी कोल्हापुरातून आपल्या अनुयायांना सत्तेच्या वळचणीकडे बोट दाखवले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उसने अवसान आणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बरसले आहेत. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है? असे म्हणताना पुलोदची दगाबाजी म्हणत त्यांनी शरद पवारांवरही घसरले आहेत.
२०२४ मध्ये महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १.५० लाखांहून अधिक बांगलादेशींनी भारतीय नागरिकत्वाची बनावट कागदपत्रे मिळवली आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. या अनियमिततेची सखोल चौकशी करून त्यात सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा सवाल करून भाजपला हिणवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना 360 अंशांनी फिरून सध्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच “ॲक्टिव्ह” दिसतात, याची कबुली द्यावी लागली.
जाणून घ्या, ते कोणत्या देशाचे नागरिक होते? विशेष प्रतिनिधी Jalgaon जळगाव येथे बुधवारी एक भीषण रेल्वे अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवांनंतर, अनेक प्रवाशांनी […]
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.
महाराष्ट्रात महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या विरोधकांना एवढे विषय हाताशी आयते लागले, की ज्यामुळे फडणवीस सरकारला जेरीस आणणे सहज शक्य होते,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातल्या आणि शिवसेना उबाठा पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा असली, तरी आता पक्षाने त्या इच्छेला फिल्टर लावला आहे.
पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने गाडीतून खाली उडी मारल्याने कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडून 13 जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराला रेल्वे रसोईतील चहावाला जबाबदार असल्याचे पुढे येत आहे. त्याने आग लागल्याचा ओरडा केल्याने प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्या.
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की हल्ला खरोखरच झाला होता की ते फक्त नाटक करत होते. सैफ अली खानला मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला पाच दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या बांगलादेशी घुसखोराने त्याच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) राज्य सरकारने विविध उद्याोगसमूह आणि बड्या कंपन्यांशी सुमारे 16 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशभरातील कंपन्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला अधिक पसंती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने इतिहास घडला आहे. दोन दिवसात १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.Maharashtra
लोकांसमोर एकमेकांची जिरवा जिरवी, पण सत्तेच्या वळसणीला जाण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काका – पुतण्यांच्या गटांमध्ये साखर पेरणी!! असला प्रकार दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली, असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App