आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.
पुरोगामित्वाच्या नावाखाली संस्कृतीला शिव्या देत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच आपल्या प्रथा आणि परंपरांबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांभिक पुरोगामित्वावर हल्ला चढविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील नीलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही.
सत्तेच्या तुकड्यासाठी “पवार संस्कारितांची” तडफड; पण नको ते ऐक्य म्हणून अजितदादांच्याच दोन नेत्यांची धडपड, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मिळणारी संभाव्य संधी धूसर!!, असे राजकीय चित्र आज समोर आले.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी पळवल्याचा आरोप धुडकावून लावला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा व खोटा आहे. ज्यांना अर्थसंकल्पाची मांडणी कळत नाही तेच असे आरोप करतात. अर्थसंकल्प न कळणाऱ्यांनी माझ्याकडे यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत.
कोर्टात आणि माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघतात वाभाडे, तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जुनी खोड अजून गेलीच नाही. त्यामुळे अजितदादांकडून निधीची आडवा आडवी होती आहे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केले नाही, म्हणून त्यांच्या नेत्यांनी सामाजिक न्यायाबद्दल बोलू नये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी हिंगोली येथील पंचायत समिती इमारतीच्या उद्घाटनासह सुमारे ७५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. यावेळी ते एका शेतकरी व महिला मेळाव्यालाही संबोधीत करणार आहेत.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मोरिया यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने’संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘बलरामपूर बायोयुग’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आज आपल्या पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर ‘बायोयुग’ हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अॅसिड) हे समाधान आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे निष्ठा, न्याय आणि धर्मपरायणतेचा अद्वितीय योग.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मान्सून २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला Mumbai Rain
पावसाळा सुरू झाला असून मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री उशिरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर दिसून येतो. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, त्यांना भाजपने आपलेसे केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतीत जे घडले, तेच वसंतराव नाईक यांच्या बाबतीत झाले!!
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन ईव्ही धोरण तयार केले आहे. याअंतर्गत, समृद्धी एक्सप्रेसवे आणि इतर ठिकाणीही इलेक्ट्रिक वाहनांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. या धोरणाचे उद्दिष्ट २०३० पर्यंत राज्यात ईव्हीची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आहे
भारताच्या सर्व सीमांवर वाईट शक्तींच्या वाईट कारवाया पाहत असल्याने भारताकडे शक्तिशाली होण्याशिवाय पर्याय नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. भागवत यांनी हिंदू समाजाला एकत्र येऊन भारतीय सैन्याला मजबूत बनवण्याचे आवाहन केले, जेणेकरून अनेक सैन्य एकत्र आले तरी ते त्यांचा पराभव करू शकणार नाहीत.
राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये भाजप आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. त्यांच्याशिवाय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App