विधान भवनात आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर फोटोसेशनचा कार्यक्रम पार पडला.
उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!, असे आज विधान परिषदेत घडले.
2024 च्या लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोन नेते “अचानक” एकत्र आले होते. त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीची घोषणा देखील केली होती. ती माध्यमांच्या पडद्यांवर आणि वर्तमानपत्रांच्या कागदावर उतरली, पण प्रत्यक्षात ती युती कधी झालीच नाही आणि तिचे राजकीय अस्तित्व कधी दिसलेच नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय गणित जुळवत मोठा डाव खेळला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती होणार असून, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.
जे बोलले नाहीत, तेच राज ठाकरेंच्या तोंडात घातले, त्यामुळे राज ठाकरेंनी टाइम्स ऑफ इंडिया सकट सगळ्या मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेचे वाभाडे काढले.
शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून कंपन्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत १० हजार कोटी रुपये कमावले, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. यामुळे कंपन्यांच्या कमाईचा आकडा पहिल्यांदाच विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर आर पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला आगामी रणनिती सांगितली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्या जर मला मरण आले तरी खंत नाही हे वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांना चांगलेच भोवले आहे. मनसेच्या राज्यव्यापी शिबिराचे निमंत्रणच त्यांना दिले गेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महाजन यांनी मी जिवंत का? अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे.
: पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या अशा गुंजवणी सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामास गती देऊन हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबईतील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) फिरोज टॉवर इमारतीला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला असून, सोमवार दुपारी ३ वाजता स्फोट होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीला पाठिंबा या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरे यांनी जास्त सावध पवित्रा घेतला.
हो, नाही करता करता अखेर जयंत पाटलांनी 2633 दिवसांनी पद सोडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. 2 खासदारांचा भाजप मोठा होऊ शकतो
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनीने भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये एक नवे पर्व सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आले आहेत. संजय शिरसाट यांच्या नेतृत्वातील सामाजिक न्याय खात्यात तब्बल 1500 कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे टेंडर रद्द करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबण हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे. यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.
सत्ताधारी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कडक भूमिका घेत आपल्या मंत्री आणि आमदारांची कानउघाडणी केली आहे. काही मंत्र्यांना यापूर्वी बदनामीमुळे पद गमवावे लागले. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा गंभीर इशारा शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला.
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.
राज्यात ३२८ नवीन दारू दुकानांचे परवाने देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये, असा नियम आम्ही बनवला आहे. आता ज्यांना दारूचे दुकान काढायचे आहे आणि परवाना मिळवायचा आहे त्यांना विधिमंडळाला याबाबत पहिली सूचना द्यावी लागणार आहे. विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय दारू दुकानांचे परवाने दिले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
भाजप मधल्या टॅलेंट ची सुप्रिया सुळेंना चिंता;; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला उपयोग का होईना??, असा सवाल सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आला.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य करत नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याविषयी संभ्रम वाढला असून त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात शरद पवारांच्या घरातूनच दोन परस्पर विरोधी वक्तव्ये समोर आली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ येणार का??, असा सवाल विचारायची वेळ खुद्द अजित पवारांच्या वक्तव्याने आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App