मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या आढावा बैठक घेतली. या बैठकीत नवीन शहरांच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा दोन टप्प्यात विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी 203 कोटी आणि ‘अर्बन ग्रोथ सेंटर’साठी 1526 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला
कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.
उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागले, अडीच वर्षांत घरी गेले; मग एकनाथ शिंदे काय करतील आणि त्यांचे काय होईल??, असा सवाल शिंदेंच्या सत्कारानंतर समोर आला.
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा आज राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. तसेच राजन साळवी हे गुरुवारी दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी दिल्लीमध्ये सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मात्र, यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्कारवर टीका केली आहे. यावर तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन, अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून योजना सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पातळीवर प्रत्यक्ष भेट द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार असे असे आरोप होत आहेत. आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आला आहे . त्यामुळे फिस्कल स्पेस कमी झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार नाही.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!, हे सत्य स्वीकारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या दोन दिवसात मधल्या घडामोडींनी आली. शरद पवारांनी राजधानी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला. पवारांनी हा बाण भाजपच्या दिशेने सोडला होता, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची सेना घायाळ झाली. संजय राऊत यांनी उतावीळपणे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांना “टार्गेट” केले. शरद पवारांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. फक्त सुषमा अंधारे संजय राऊत यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.
राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालकांवर केलेल्या अश्लील विनोदांबद्दल रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. राष्ट्रीय महिला आयोगाने आरोपींना समन्स पाठवले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
ठाकरेंना सोडून पवार शिंदेंच्या पुठ्ठ्यात शिरले; माध्यमनिर्मित चाणक्याचे “नवे डाव” सुरू झाले, पण अखेर ते भाजपच्याच हातातले “खेळणे” बनले!!, हे सत्य स्वीकारायची वेळ शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून आणली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुचकारून शरद पवारांनी भाजप वर बाण सोडला, पण यातून भाजप घायाळ व्हायच्या ऐवजी ठाकरे सेनाच घायाळ झाली. पवारांचा मिठी छुरीचा “राजकीय हल्ला” शिंदेंनी चतुराईने परतावला
दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालावी का? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून यावर ३ आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची भूमिका मांडली आहे.
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न मी करत होतो. मात्र जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार आहोत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर इंडिया ब्लॉकच्या एकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी असेही म्हटले आहे की ते २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका एकट्या लढवतील.
शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
महिला सक्षमीकरणाचा जागर करत राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देत भक्कम पाया रचणाऱ्या महिलांचा उल्लेख करताना यामध्ये देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विसर पर्यटन विभागाला पडला आहे.
मनोज्ञ जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत असलेली वाहने वाळू माफियांची आहेत.
साहित्य संमेलनात राजकारण हा विषय नवीन नाही आणि त्याहीपेक्षा शरद पवार कुणाला तरी “टोपी” घालणार, हा देखील विषय नवीन नाही.
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला आहे. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली.
मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App